शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

ननाशीच्या रूग्णाची कोरोनाशी झुंज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 00:23 IST

ननाशी : येथील बाधित रूग्णाने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून आठ जुलैला या रूग्णाला जिल्हा रु ग्णालयातून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले. ननाशी येथील ५३ वर्षीय एका मसाला विक्रेत्याला गत आठवड्यात कोरोना सदृश लक्षणे जाणवू लागल्यामुळे २९ जूनला त्यांना जिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले.

ननाशी : येथील बाधित रूग्णाने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून आठ जुलैला या रूग्णाला जिल्हा रु ग्णालयातून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले. ननाशी येथील ५३ वर्षीय एका मसाला विक्रेत्याला गत आठवड्यात कोरोना सदृश लक्षणे जाणवू लागल्यामुळे २९ जूनला त्यांना जिल्हा रु ग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी त्यांचा स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आला परंतु या स्वॅबचा रिपोर्ट अनिर्णित आल्याने पुन्हा त्यांचे स्वब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आला. त्याचा ३ जुलै रोजी अहवाल प्राप्त होऊन कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे ग्रामपंचायततर्फे कंटेन्मेंट झोन निश्चित करून सील करण्यात आला. तसेच या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या व्यक्तींना कोविड केअर सेंटरला पाठविण्यात आले. गावातील नागरिकांनी स्वत:ची काळजी घेऊन प्रशासन आणि आरोग्य विभाग वेळोवेळी देत असलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. सुलोचना भोये, सरपंच दत्ता शिंगाडे, ग्रामविकास अधिकारी एम. पी. गावित यांनी यावेळी केले आहे.-------------------------कोविड केअर सेंटरला पाठविलेल्या व्यक्तींचेही अहवाल निगेटीव्ह आले. या रूग्णावर जिल्हा रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आले आणि परत एकदा त्यांची तपासणी करन्यात आली त्याचे अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या रुग्णाचा प्रशासनाच्या वतीने सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

टॅग्स :Nashikनाशिक