शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या स्वीकृत नावांचा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 01:01 IST

भाजपा आमदारांच्या अंतर्गत संघर्षामुळे रखडलेली महापालिकेच्या स्वीकृत सदस्यांची नावे रविवारी म्हणजे आयुक्तांनी बोलाविलेल्या बैठकीच्या पूर्वसंध्येलाही निश्चित होऊ शकलेली नाही. त्यामुळे सोमवारी (दि.२५) होणाºया बैठकीतही भाजपाकडून या विषयाला बगल दिली जाण्याची शक्यता आहे. भाजपाचे सर्व आमदार दिल्ली येथे बैठकीसाठी रवाना झाले असून, ते बुधवारी परतणार आहेत. त्यामुळे पुढील महिन्याच्या महासभेतच या नावांची घोेषणा होण्याची शक्यता आहे.

नाशिक : भाजपा आमदारांच्या अंतर्गत संघर्षामुळे रखडलेली महापालिकेच्या स्वीकृत सदस्यांची नावे रविवारी म्हणजे आयुक्तांनी बोलाविलेल्या बैठकीच्या पूर्वसंध्येलाही निश्चित होऊ शकलेली नाही. त्यामुळे सोमवारी (दि.२५) होणाºया बैठकीतही भाजपाकडून या विषयाला बगल दिली जाण्याची शक्यता आहे. भाजपाचे सर्व आमदार दिल्ली येथे बैठकीसाठी रवाना झाले असून, ते बुधवारी परतणार आहेत. त्यामुळे पुढील महिन्याच्या महासभेतच या नावांची घोेषणा होण्याची शक्यता आहे. महापालिकेत भाजपाचे तीन तर शिवसेनेचे दोन स्वीकृत सदस्य (नगरसेवक) पक्षीय तौलनिक बळानुसार नियुक्त करण्यात येणार आहेत. शिवसेनेच्या वतीने दोन नावे जवळपास निश्चित करण्यात आली आहेत. मात्र, भाजपाचा घोळ मिटत नसल्याचे दिसते आहे. भाजपा शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी ठरविलेली नावे अन्य आमदारांना मान्य नाहीत. गेल्या वेळी ही नावे देण्याची वेळ आली तेव्हा म्हणजे १५ सप्टेंबर रोजी शहरातील एका आमदाराने सर्वांना विश्वासात न घेता नावे निश्चित करण्यात येत असल्याची तक्रार पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली होती. त्यामुळे भाजपाने ही प्रक्रिया स्थगित केली. भाजपाने उमेदवार निश्चितीसाठी महिनाभराची मुदत मागून घेतली. स्वीकृत नगरसेवक हे महापौरपदाच्या निवडणुकीनंतर महिनाभरात ही नियुक्ती होणे आवश्यक होते, परंतु ते शक्य झालेले नाही. आता आयुक्तांनी याबाबत सोमवारी (दि.२५) बैठक बोलावली असून, त्यात नावे जाहीर होण्याची शक्यता होती. तथापि, त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या हालचाली रविवारी झाल्या नाहीत.त्यातच दिल्ली येथे भाजपाच्या राष्टÑीय कार्यकारिणीची बैठक असून, त्यासाठी सर्व आमदार आणि खासदारांना उपस्थित राहण्याचे फर्मान आल्याने हे सर्व जण रवाना झाले आहेत. हे सर्व बुधवारी किंवा गुरुवारी नाशिकला परतणार असून, त्यानंतर त्यावर हालचाली सुरू होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार स्वीकृत सदस्यांची नावे महासभेत घोषित करायची असल्याने अजून अवकाश असून, त्यामुळेच दसºयानंतर नावे निश्चित होण्याची शक्यता आहे. भाजपाचे आमदार बाळासाहेब सानप यांनी मात्र अद्याप स्वीकृत सदस्यांची नावे निश्चित झाली नसल्याचे स्पष्ट केले.