सटाणा : शहरातील जलसंपदा विभागाचे विश्रामगृह हे कुत्र्यांचे की, माणसांचे यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शनिवारी (दि.३०) संध्याकाळी ७ वाजता या विश्रामगृहास भेट दिली असता व्हीआयपी रूम भटक्या कुत्र्यांचे ठिकाण बनल्याचे आढळून आले. ब्रिटीशकालीन शासकीय विश्रामगृहात आराम विभाग असून यातील एक व्हीआईपींसाठी तर दुसरा सामान्य नागरिकांसाठी आहे. जलसंपदा विभागाच्या देखभाली खाली असलेले विश्रामगृह ‘‘आओ जावो घर तुम्हारा’’ असेच असल्याचे वास्तव समोर आले असून सामन्यांसाठी असलेल्या सूट मध्ये चक्क भटके कुत्रे आढळून आले. कुत्र्यांचा मुक्काम रोज असल्याने या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पुढे आली आहे. (वार्ताहर)
शासकीय विश्रामगृह बनले भटक्या कुत्र्यांचे आश्रयस्थान
By admin | Updated: October 31, 2015 22:50 IST