नाशिक : नामदेव शिंपी समाजाचा राज्यव्यापी वधू-वर पालक परिचय मेळावा रविवारी (दि.८) उत्साहात पार पडला. यावेळी नाशिक, नगर, पुणे आदि राज्यभरातील ७५० इच्छुक वधू-वरांनी नोंदणी केली. कार्यक्रमाचे उद्घाटन विद्युत महामंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संजीव तुपसाखरे, नंदलाल काळे, अतुल मानकर, वृषाली तुपसाखरे, अर्चना मानकर, वासंती रहाणे, प्रवीण पवार आदि उपस्थित होते. सामुदायिक विवाह, विवाहखर्चात बचत यांसारखे उपक्रम राबवून समाजापुढे आदर्श ठेवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मेळाव्यास अरुण लचके, अशोक कालेकर, रमेश बाकरे, योगेश वारे, रमेश चांडोले, विजय ओसरकर, सदाशिव गिते, सोमनाथ देशमानकर यांच्यासह नामदेव शिंपी समाज कार्यकारिणी, समाजबांधव आदि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नामदेव शिंपी समाजाचा वधू-वर मेळावा उत्साहात
By admin | Updated: January 12, 2017 00:41 IST