शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

‘नमामि गोदा’ला तरुणाईची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 00:46 IST

: ब्रह्मगिरीवरून रविवारी निघालेली नमामि गोदा फाउंडेशनची ‘वारी गोदावरी’ सोमवारी (दि.२१) शहरात आली. शहरातील प्रमुख महाविद्यालयांमध्ये वारीमधील स्वयंसेवकांनी तरुणाईसोबत संवाद साधत गोदावरी विकास व संवर्धनासाठी कृती करण्याची वेळ आल्याचे सांगितले. यावेळी तरुणाईने उत्स्फूर्तपणे कृतिशील सहभाग घेण्याचे वचन सदस्यांना दिले.

नाशिक : ब्रह्मगिरीवरून रविवारी निघालेली नमामि गोदा फाउंडेशनची ‘वारी गोदावरी’ सोमवारी (दि.२१) शहरात आली. शहरातील प्रमुख महाविद्यालयांमध्ये वारीमधील स्वयंसेवकांनी तरुणाईसोबत संवाद साधत गोदावरी विकास व संवर्धनासाठी कृती करण्याची वेळ आल्याचे सांगितले. यावेळी तरुणाईने उत्स्फूर्तपणे कृतिशील सहभाग घेण्याचे वचन सदस्यांना दिले. गोदा प्रदूषणमुक्ती आणि नैसर्गिक प्रवाहचा विकास या दृष्टिकोनातून स्थापन करण्यात आलेल्या ‘नमामि गोदा फाउंडेशन’कडून पहिल्या टप्प्यात गोदेचे उगमस्थान असलेले त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी पर्वतापासून गोदा जल कलशासोबत ‘वारी गोदावरी’ हा उपक्रम राबविण्यात आला. ब्रह्मगिरी ते रामकुंड असा पहिला टप्पा रविवारी संध्याकाळी पूर्ण करण्यात आला.यावेळी ब्रह्मगिरी येथील गोदा जल रामकुंडात सोडण्यात आले. याप्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पंडित, अभिनेता चिन्मय उद्गीरकर, धनश्री क्षीरसागर, किरण भालेराव, सुनील मेंढेकर, रोहन देशपांडे, अविनाश आव्हाड, नूपुर सावजी, अ‍ॅड. शिरीष दंदणे आदि उपस्थित होते. सकाळी सोमेश्वर मंदिरापासून वारीचा प्रवास रामकुंडाच्या दिशेने सुरू झाला. सकाळी साडेदहा वाजता वारी भोसला महाविद्यालयात दाखल झाली. यावेळी उद्गीरकर, क्षीरसागर, पंडित यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत गोदा प्रदूषणमुक्तीबाबत प्रबोधन सातत्याने झाले अन् होत आहे; मात्र गोदावरीला आता कृतीची गरज आहे, असे पटवून दिले. यावेळी तरुण-तरुणींनी फाउंडेशनसोबत कृतिशील प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन दिले. दुपारी १२ वाजता न. भ. ठाकूर विधी महाविद्यालयात वारी पोहचली. भावी वकिलांशी संवाद साधत त्यांनाही गोदा प्रदूषणमुक्तीच्या चळवळीत कृतिशील सहभागी होण्याची साद घालण्यात आली. तसेच बीवायके महाविद्यालयामध्येही विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला. एकूणच आज अखेरच्या दिवशी वारी गोदावरी’ला तरुणाईची साथ लाभली. यावेळी कॉलेजरोडवरील प्रिं.टी.ए.कुलकर्णी चौकामध्ये वारीचे ढोलपथकाने जोरदार स्वागत केले