हरसूल : नाचलोंढी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींनी रक्षाबंधनासाठी आपल्या लाडक्या भाऊरायला बांधण्यासाठी स्वत:च्या हाताने शाळेतच राख्या तयार केल्या. तयार झालेल्या राख्यांपैकी काही राख्या देशाच्या रक्षणासाठी सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना बांधल्या जाणार आहे.अशा स्वरूपाचा उपक्र म शाळेत राबवून अभ्यासाव्यतिरिक्त मुलींना व्यावसायिक स्वरूपाचेसुद्धा शिक्षण बालवयात मिळावे तसेच मुलीच्या आवडत्या सणासाठी त्यांच्या स्वत:च्या हाताने केलेली राखी यामुळे त्यांच्यामध्ये वेगळा उत्साह पाहण्यास मिळाला, अशी माहिती मुख्याध्यापक यांनी दिली. यावेळी शिक्षका नीलिमा तुंगार व मीराबाई मौळे यांनी विद्यार्थिनींना राखी तयार करण्याचे प्रशिक्षण दिले.
नाचलोंढी येथे विद्यार्थिनींनी तयार केल्या राख्या
By admin | Updated: August 9, 2014 00:50 IST