मांडवड : महीला व बालविकास विभागाच्या ८ ते २२ मार्च दरम्यान राबविण्यात येत असलेल्या पोषण पखवाड्याचे कार्यक्र म मंगळवारी (दि.१९) लक्ष्मीनगर येथे महीला व किशोर वयीन मुलींच्या सहभागाने राबविण्यात आला.यामध्ये किशोरी मुलीचे खाद्य पदार्थाचे वस्तु बनविण्याच्या स्पर्धा ठेऊन विजेत्या मुलींना बक्षीस देण्यात आले. त्याच प्रमाणे गावात विविध प्रकार असलेल्या बैलगाडीतुन टाळ मृदुंगाच्या तालावर महीलांची व मुलीची मिरवणुक काढण्यात आली.विषेश म्हणजे मिरवणुकीत टाळ, विणेकरी व मृदुंग वाजविणारे सर्व बाल कलाकारच होते.या कार्यक्र मासाठी गाव परीसरातील सर्व महीला व किशोरवयीन मुलींनी उपस्थिती दर्शविली होती. कार्यक्र मानंतर सर्व उपस्थीत महीला व मुलींना पुरण पोळीचे मिष्ठान्न भोजन देण्यात आले. या कार्यक्र मासाठी गावातील अंगणवाडी सेविका लक्ष्मीबाई राजगुरु व मदतनीस लक्ष्मीबाई जाधव यांचे सहकार्य लाभले. पर्यवेक्षक ललिता चौधरी यांचे मार्गदर्शन लाभले.
लक्ष्मीनगरला पोषण पखवाडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 7:12 PM
मांडवड : महीला व बालविकास विभागाच्या ८ ते २२ मार्च दरम्यान राबविण्यात येत असलेल्या पोषण पखवाड्याचे कार्यक्र म मंगळवारी (दि.१९) लक्ष्मीनगर येथे महीला व किशोर वयीन मुलींच्या सहभागाने राबविण्यात आला.
ठळक मुद्देकिशोरी मुलीचे खाद्य पदार्थाचे वस्तु बनविण्याच्या स्पर्धा ठेऊन विजेत्या मुलींना बक्षीस देण्यात आले.