शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

वतनाच्या जमिनींमध्ये ‘नजराणा’ घोटाळा

By admin | Updated: March 7, 2017 01:13 IST

नाशिक : बागलाण, कळवण व सुरगाणा या तीन तालुक्यांतही तत्कालीन प्रांत अधिकाऱ्यांनी इनाम वतनाच्या जमिनींच्या व्यवहारांना बेकायदेशीर परवानगी देऊन शासनाचे नुकसान केल्याची तक्रार करण्यात आली आहे.

 नाशिक : नांदगाव तालुक्यात नवीन शर्तीच्या जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारात शासनाच्या नजराणा रकमेच्या फसवणुकीचे प्रकरण ताजे असतानाच बागलाण, कळवण व सुरगाणा या तीन तालुक्यांतही तत्कालीन प्रांत अधिकाऱ्यांनी इनाम वतनाच्या जमिनींच्या व्यवहारांना बेकायदेशीर परवानगी देऊन शासनाचे नुकसान केल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नांदगावच्या प्रकरणात ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, त्या अ‍ॅड. शिवाजी सानप यांनीच ही तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे करून त्यांना पेचात पकडले आहे. यासंदर्भात गेल्या आठवड्यातच अ‍ॅड. सानप यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून कारवाईची मागणी केली असून, तसे न झाल्यास थेट उच्च न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिला आहे. इनाम वर्ग ६ ब च्या महार वतनाच्या जमिनींची खरेदी-विक्री करावयाची झाल्यास त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल व कूळ कायदा शाखेची अनुमती घेणे जमीन महसूल अधिनियमान्वये अनिवार्य आहे. अशा जमिनीच्या खरेदी, विक्रीची परवानगी देताना चालू बाजारभावाच्या ५० टक्के रक्कम नजराणा म्हणून शासनाच्या तिजोरीत भरणे क्रमप्राप्त आहे. असे असतानाही कळवणच्या उपविभागीय अधिकाऱ्यांनी महसूल शाखेची अनुमती न घेता आपल्या अधिकारातच या जमिनींच्या खरेदी, विक्री व्यवहाराला ना हरकत दाखला देऊन शासनाच्या महसुलाचे नुकसान केल्याचे सानप यांनी पत्रात म्हटले आहे. या तक्रारीच्या पृष्ठ्यर्थ सानप यांनी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी बागलाण, कळवण व सुरगाणा तहसीलदारांना यासंदर्भात सन २०१४ मध्ये दिलेले पत्रही सादर केले आहे. अ‍ॅड. सानप यांच्या तक्रारीमुळे पुन्हा एकवार महसूल व लाचलुचपत प्रतिबंधक खात्यात खटके उडण्याची शक्यता निर्माण झाली असून, नांदगावच्या नवीन शर्तीच्या जमीन व्यवहारात शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा नजराणा बुडवून फसवणूक व रकमेचा अपहार केल्याच्या तक्रारीवरून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने जानेवारीत प्रांत, तहसीलदारासह २३ व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला. या गुन्ह्यात अ‍ॅड. सानप यांच्यासह त्यांच्या दोन्ही पुत्रांना सह आरोपी करण्यात आलेले आहे. या गुन्ह्णात सानप यांच्यासह सर्वच संशयितांना न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केले आहे.