नायगाव : जागतिक क्षयरोग रोग सप्ताहानिमित्ताने सिन्नर आगारातील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन व मास्क, सॅनिटायझरचे वितरण करण्यात आले.
आरोग्य विभाग व पंचायत समिती यांच्या वतीने जागतिक क्षयरोग दिनाची ह्यद क्लॉक इज टिकिंगह्ण ही थीम घेऊन हा जागतिक क्षयरोग सप्ताह साजरा होत आहे. आरोग्य विभाग जिल्हा क्षयरोग विभाग नाशिक,जिल्हा परिषद व नगरपालिका सिन्नर यांचे संयुक्त विद्यमाने क्षयरोग जनजागृती सप्ताह निमित्ताने राज्य परिवहन महामंडळाच्या सिन्नर आगार अधिकारी व कर्मचारी यांना मास्कचे वितरण सिन्नर पंचायत समिती आरोग्य विभागाचे वतीने करण्यात आले होते.याप्रसंगी आगारप्रमुख भूषण सूर्यवंशी, एस काळे व नियंत्रक,वाहक, चालक, तंत्रज्ञ समवेत मुखपट्टी वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आले. सदर कार्यक्रम क्षयरोग, एचआयव्ही व कोविड याचे माहिती, संवाद माध्यमातून देऊन ह्यमाझे कुटुंब माझी जबाबदारीह्ण याचे पालन व प्रत्यक्ष कृती अंमलबजावणी गरज याचे सादरीकरण करण्यात आले.याप्रसंगी प्रकाश जाधव वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक, विलास बोडके समुपदेशक, तसेच सचिन पांचाळ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अनिल नवले क्षयरोग सहायक आदी उपस्थित होते.