शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

नायगाव रस्ता वाहतुकीसाठी खुला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2020 00:40 IST

नायगाव : लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणारा सिन्नर-नायगाव हा रस्ता मंगळवारी दुपारनंतर अज्ञात व्यक्तींनी झाडे टाकून वाहतुकीसाठी बंद केला होता. याबाबत ‘लोकमत’ने बुधवारी वृत्त प्रसिद्ध करताच हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने अत्यावश्यक माल वाहतूकदारांनी समाधान व्यक्त केले आहे.

नायगाव : लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सिन्नर व निफाड या दोन तालुक्यांना जोडणारा सिन्नर-नायगाव हा रस्ता मंगळवारी दुपारनंतर अज्ञात व्यक्तींनी झाडे टाकून वाहतुकीसाठी बंद केला होता. याबाबत ‘लोकमत’ने बुधवारी वृत्त प्रसिद्ध करताच हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने अत्यावश्यक माल वाहतूकदारांनी समाधान व्यक्त केले आहे.  केंद्रासह राज्य शासनाने कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउनचा कालावधी वाढवला आहे. त्यामुळे शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर सर्वत्र सतर्कता बाळगली जात आहे. अनेक गावांत कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून गावाच्या वेशी बंद केल्या जात आहे. अशा वातावरणात संसर्ग रोखण्याच्या नावाखाली सिन्नर- नायगाव-सायखेडा या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्यावर मापरवाडी परिसरात अज्ञात लोकांनी चार ठिकाणी मोठ मोठी झाडे रस्त्यावर आडवी टाकून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता. मंगळवारी ( दि.१४ ) दुपारनंतर अचानक हा रस्ता बंद झाल्याने भाजीपाला, दूध आदीसह अनेक अत्यावश्यक मालाची वाहतूक करणाºया तसेच दवाखान्यात जाणाऱ्यांना माळेगाव एमआयडीसी या पर्यायी मार्गाने तालुक्याच्या गावी जावे लागले.दरम्यान अत्यावश्यक सेवांना बाधा या मथळ्याने दोन तालुक्यांना जोडणारा रस्ता बंद असे वृत्त ‘लोकमत’ने बुधवारी ( दि.१५) प्रसिद्ध करताच दुपारनंतर शासकीययंत्रणेमार्फत या रस्त्यावरील झाडे व काचा बाजूला सारून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.त्यामुळे भाजीपाला, दूध आदींसह अन्य अत्यावश्यक सेवा पुरविणारी वाहतूक सुरळीत झाल्याने वाहनचालकांबरोबर सर्वसामान्य नागरिक समाधान व्यक्त करीतआहे.

टॅग्स :Nashikनाशिक