शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
3
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
5
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
6
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
7
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
8
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
9
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
10
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
11
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
12
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
13
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
14
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
15
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
16
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
17
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
18
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले
19
मुंबईची राज्यात तिसऱ्या स्थानी झेप, गतवर्षीच्या तुलनेत एक टक्का वाढ
20
भाजप जिल्ह्याध्यक्षांची संभाव्य नावे प्रदेशाकडे ; नावांबाबत उत्सुकता; आठवडाभरात निर्णय

नार-पार, दमणगंगेचे पाणी महाराष्टÑातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 22:20 IST

सटाणा : नार-पार, दमणगंगेचे पाणी गुजरातला जाऊ देणार नाही,हे पाणी महाराष्टÑातच राहिल, यासाठी पुन्हा हल्लाबोल आंदोलन करू असा निर्धार करीत निष्क्रिय सरकारला वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही, असे परखड मत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाचे रविवारी (दि. १८) दुपारी सटाणा येथे आगमन झाले. त्यानिमित्त आयोजित सभेत तटकरे बोलत होते.हल्लाबोल यात्रेचा नाशिक जिल्ह्याचा समारोप होऊन यात्रा पुढे नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरकडे रवाना झाली.

ठळक मुद्देसुनील तटकरे : सटाणा येथे राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चा नवापूरकडे रवानाया सरकारची बेटी पढाओ, बेटी बढाओ ही घोषणा फक्त जाहिरातीपुरती मर्यादित

सटाणा : नार-पार, दमणगंगेचे पाणी गुजरातला जाऊ देणार नाही,हे पाणी महाराष्टÑातच राहिल, यासाठी पुन्हा हल्लाबोल आंदोलन करू असा निर्धार करीत निष्क्रिय सरकारला वठणीवर आणल्याशिवाय राहणार नाही, असे परखड मत राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाचे रविवारी (दि. १८) दुपारी सटाणा येथे आगमन झाले. त्यानिमित्त आयोजित सभेत तटकरे बोलत होते.हल्लाबोल यात्रेचा नाशिक जिल्ह्याचा समारोप होऊन यात्रा पुढे नंदुरबार जिल्ह्यातील नवापूरकडे रवाना झाली.देश व राज्यातील भाजपा सरकारने जनतेचा भ्रमनिरास केल्यामुळे मोठी चीड निर्माण झाली आहे. हल्लाबोल मोर्चाला जनतेकडूनमिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हे त्याचे द्योतक असल्याचा दावा त्यांनी केला. २०१९ च्या निवडणुकीत या फसव्या सरकारला गाडण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या पाठीशी राहण्याचे आवाहन तटकरे यांनी यावेळी केले. आपल्या भाषणात राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणावर टीका करत भाजपा सरकारवर तटकरे यांनी नाराजी व्यक्त केली.विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली. अच्छे दिनच्या नावाखाली भाजपाने जनतेचे मतपरिवर्तन केले; मात्र सत्ता येऊन चार वर्षे उलटली तरी अच्छे दिन हे केवळ दिवास्वप्न ठरले आहे. अजून एक वर्ष वाट पाहा, येणारे दिवस आपलेच आहेत. आम्हाला सत्ता दिल्यास काळा पैसा आणून प्रत्येक भारतीयाच्या बँक खात्यावर १५ लाख रुपये जमा करण्याचे पंतप्रधान मोदींनी दिलेले आश्वासनदेखील हवेत विरले आहे. विजय मल्या, नीरव मोदींसारख्या कर्जबुडव्यांमुळे प्रत्येक देशवासीयावर १५ लाख रु पये कर्ज होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. फसवी कर्जमाफी, वाढती बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, मराठा आणि मुस्लीम समाजाचे आरक्षण आणि वाढत्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी सरकारच्या विरोधात रस्त्यावर आली असून, जोपर्यंत सामान्य जनतेला न्याय मिळणार नाही तोपर्यंत राष्ट्रवादीचा हल्लाबोल थांबणार नाही, असा इशारा विरोधी पक्षनेते मुंडे यांनी दिला.आमदार दीपिका चव्हाण यांनी विकासकामांसाठी शासनाकडे तगादा लावूनही ती होत नसल्याचे सांगितले. आघाडी सरकारच्या काळात सार्वजनिक कामांना प्राधान्य देऊन एकजुटीने कोणत्याही आमदारांची कामं केली जायची. मात्र भाजपा सरकार विरोधी पक्षातील आमदारांना योग्य वागणूक देत नसल्याची टीका यावेळी आमदार चव्हाण यांनी केली. राष्ट्रवादी युवती कॉँग्रेसच्या अध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांनीही सरकारवर टीका केली.हल्लाबोल यात्रेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, जयंत पाटील, महिला प्रदेश अध्यक्ष चित्र वाघ, संग्राम कोते-पाटील, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, आमदार दीपिका चव्हाण, पंकज भुजबळ, यतीन पगार, संजय सोनवणे, तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, शहराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, रंजन ठाकरे, संजय चव्हाण, प्रेरणा बलकवडे, विजय वाघ, काका सोनवणे, नितीन सोनवणे, रत्नाकर सोनवणे, नितीन सोनवणे, सनी देवरे, अमोल बच्छाव आदींसह शेकडो नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी यांनी केले.भारत पाकिस्तान सीमेवर सैनिक शहीद होत आहेत. त्यांच्या कुटुंबीयांचे दु:ख मी पाहिले आहे. दोन देशांतील प्रश्न सोडविण्यासाठी युद्ध नाही तर चर्चा हा उपाय आहे. दुर्दैवाने आपले पंतप्रधान पाकिस्तानात जन्मदिनाचा केक खायला जातात पण तणाव मिटवण्यासाठी चर्चा करत नाहीत. डिजिटल इंडिया झालाच पाहिजे, पण त्यासोबतच लोकांच्या पोटाला अन्न मिळणंही जास्त महत्त्वाचे आहे. शेतकरी जगला तरच तो अन्न पिकवू शकेल. त्यामुळे त्याला जगवण्यासाठी सरकारने मदत ही केलीच पाहिजे. स्त्री-पुरु ष लिंग गुणोत्तरात महाराष्ट्राचा क्र मांक खाली घसरला आहे. स्त्रीभ्रूणहत्या वाढलेल्या आहेत. गुजरात मॉडेलचा गवगवा करणाºया गुजरातचा क्र मांक महाराष्ट्रापेक्षाही खाली आहे. या सरकारची बेटी पढाओ, बेटी बढाओ ही घोषणा फक्त जाहिरातीपुरती मर्यादित आहे.- सुप्रिया सुळे, खासदार