शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या नागेश कांबळेंची ‘रेफरन्स सर्व्हिस’

By admin | Updated: September 26, 2016 00:58 IST

ग्रंथसूचीकार : दोनशे वर्षांचा मराठी साहित्यविषयक इतिहास उपलब्ध

धनंजय वाखारे : नाशिकमराठीतील एखाद्या साहित्यिकाविषयी, त्यांच्या गं्रथसंपदेविषयी कोणाला काही संदर्भ हवा असेल तर त्याने नाशिकच्या नागेश कांबळे यांच्याशी संपर्क साधावा आणि कांबळे यांनीही दिवस-रात्र कालमान न पाहता तितक्याच उत्साहाने संशोधकांची संदर्भविषयक भूक भागवावी, असा नित्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून अखंड सुरू आहे. अनेक दिग्गज लेखकांच्या ग्रंथसूची निर्माण करणाऱ्या या अवलियाची संपूर्ण महाराष्ट्रात ‘ग्रंथसूचीकार’ म्हणून ओळख बनली आहे. आजमितीला कांबळे यांच्याकडे मराठी साहित्याचा सुमारे २०० वर्षांचा समृद्ध इतिहास उपलब्ध आहे. घरामध्ये आपल्याला साधी किराणा मालाची यादी करायची तर आधी घरात काय आहे अन् काय नाही, याची शोधाशोध करावी लागते. परंतु नाशिकस्थित नागेश कांबळे यांनी तर नावाजलेल्या साहित्यिक-लेखकांच्या ग्रंथसंपदांची सूची अतिशय मेहनतीने तयार करत संशोधक आणि वाचकांचा मार्ग प्रशस्त केला आहे. सूची बनविण्याचे किचकट आणि गुंतागुंतीचे काम करताना कांबळे यांनी केवळ ग्रंथांची नामावली दिलेली नाही, तर त्या-त्या लेखकाची झालेली जडणघडण, मिळालेले पुरस्कार, अप्रकाशित वा दुर्मीळ साहित्य अशा विविध बाबींचा अंतर्भाव करत ग्रंथसूचीचे संदर्भमूल्य अधिक परिपूर्ण केले आहे. नाशिकच्या राजीवनगर भागातील कांबळे यांच्या ‘स्वप्नपूर्ती’ बंगल्यात तुम्ही कधी गेलात, तर कांबळे तुम्हाला सतत लिखाणकामात व्यग्र असलेले बघायला मिळतील. त्यांची खोली विविध वृत्तपत्रांची कात्रणे, नियतकालिके, पुस्तके, झेरॉक्स प्रतींचे गठ्ठे यांनी व्यापलेली दिसेल. मूळचे तुळजापूरचे असलेले कांबळे यांच्या कुटुंबीयांचा भिक्षुकी व्यवसाय. त्यांचे कुटुंब हे तुळजाभवानी मंदिराचे पुजारी. शासकीय सेवेत ग्रंथपाल म्हणून दाखल झालेले नागेश कांबळे यांचे सेवाकाळात नाशिकला वास्तव्य होते तेव्हा कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचा सहवास लाभला. एकदा तात्यासाहेबांशी गप्पा मारत असताना आपण कोठे, काय लिखाण केले याची नोंद खुद्द तात्यासाहेबांकडेही नव्हती. त्यातूनच कांबळे यांनी तात्यासाहेबांच्या विविधांगी साहित्याची सूची करण्याची इच्छा बोलून दाखविली. तात्यांचा होकार मिळाल्यानंतर कांबळे यांनी मेहनतीने संदर्भ गोळा करत सुसज्ज अशी सूची तयार केली. आपल्या साहित्यप्रपंचाची कुंडलीच हाती पडल्याचे पाहून तात्यासाहेब हरखून गेले आणि त्यांनी कांबळेंना पेन भेट दिले. तेथूनच कांबळे यांच्यातील सूचीकाराचा प्रवास सुरू झाला. सेवानिवृत्तीनंतर नाशिकला स्थायिक झालेले कांबळे यांच्याकडे दोनशे वर्षांचा मराठी साहित्याचा पट उपलब्ध आहे. तुम्ही कोणताही संदर्भ विचारा, कांबळे यांच्याकडून लगेच मिळणारा प्रतिसाद हा त्यांच्यातील प्रतिभेची चुणूकही दाखवतो. वयाच्या सत्तरीतही हा माणूस झपाटल्यागत काम करतो आहे आणि संशोधकांची संदर्भभूक न थकता उत्साहाने भागवितो आहे. समग्र सावरकर वाङ्मयकोशचे निर्माणकार्यनागेश कांबळे यांना सध्या ‘सावरकर’ या नावाने झपाटले आहे. कांबळे यांच्याकडून समग्र सावरकर वाङ्मयकोशचे निर्माणकार्य सुरू आहे. पाच खंडात साकार होणारा हा ग्रंथ सुमारे दहा हजार पानांचा असेल, अशी माहिती नागेश कांबळे देतात. त्यात प्रामुख्याने, सावरकरांनी लिहिलेले ग्रंथ, सावरकरांवर इतरांनी लिहिलेले ग्रंथ, विविध मासिकांचे विशेषांक, सावरकरांवर विविध संस्थांनी काढलेल्या स्मरणिका, सावरकरांवर विविध नियतकालिके व वृत्तपत्रांत आलेले लेख आदिंचा समावेश आहे. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांशी संबंधित सर्व संदर्भ त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. ‘ज्ञान वाटल्याने वाढते’ यावर विश्वास असलेल्या कांबळे यांच्याकडून कोणताही मोबदला न घेता दिली जाणारी ही संदर्भ सेवा आजवर असंख्य संशोधक, वाचक व लेखकांना उपयुक्त ठरली आहे. आतापर्यंत कांबळे यांनी व्यंकटेश माडगूळकर, श्री. ना. पेंडसे, विजय तेंडुलकर, वसंत कानेटकर, मंगेश पाडगावकर आदि दिग्गज लेखकांच्या ग्रंथसूचींचे काम पूर्णत्वाला नेलेले आहे. त्यांची पुस्तकेही प्रकाशित झाली आहेत.