शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायतीत कामकाज ठप्प

By admin | Updated: June 15, 2015 00:13 IST

आंदोलन : मुख्याधिकारी अद्याप रुजू नाही

कळवण : ग्रामपंचायतचे नगरपंचायत होऊनदेखील प्रशासकामार्फत कामकाज सुरू झाले असले, तरी नगरपंचायतीस अजूनपर्यंत पूर्णवेळ मुख्याधिकारी न मिळाल्याने कामकाज पूर्णत: ठप्प झाले आहे. याबाबत सातत्याने मागणी करण्यात येऊनदेखील मुख्याधिकारी न आल्याने छावा क्रांतिवीर सेनेने गांधीगिरी आंदोलन केले. नगरपंचायतच्या खुर्चीस टोपी, हार घातला. राज्य शासनाने कळवण ग्रामपालिकेचे रूपांतर नगरपंचायतमध्ये केले आहे. नगरपंचायतच्या कारभारावर नजर ठेवण्यासाठी प्रशासकपदी तहसीलदार अनिल पुरे यांची नियुक्ती केली आहे. गेल्या अडीच महिन्यापासून नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नगरपंचायतच्या कामकाज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अधिकृत कागदपत्रे प्राप्त न झाल्याने कळवण नगरपंचायतचे कामकाज पूर्णत: ठप्प झाल्याने नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. विविध दाखले, गटारी दिवाबत्ती, पाण्याची सोय होत नसल्यामुळे ग्रामस्थांना नाहक हाल सहन करावे लागत आहेत; मात्र प्रशासन बसले आहे. नगरपंचायत लागू झाल्याने सर्व कामकाज हे नगरपंचायतच्या नावानेच करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच कळवण ग्रामपालिकेचे नाव बदलून ते कळवण नगरपंचायत कार्यालय असे करावे तसेच रजिस्टर, सर्व शिक्के, पावत्या व दाखले हे नगरपंचायतच्या नावाने देण्याचे आदेश आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून नगरपंचायतचे रजिस्टर, शिक्के व मुख्याधिकाऱ्यांची नेमणूक झाली आहे .ज्या नागरिकांना शासकीय कामकाजासाठी रहिवासी दाखला लागतो आहे, परंतु दाखले मिळत नाही, त्याचप्रमाणे नळपट्टी व इतर कर भरणा करण्यास जाणाऱ्या ग्रामस्थाकडून कर भरणाही करून घेतला जात नसल्याचे काही नागरिकांनी सांगितले. यामुळे ‘नको ती नगरपंचायत, आपली ग्रामपालिकाच बरी’ असे म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. मात्र अशीच परिस्थिती राहिल्यास आठ दिवसांत छावा पद्धतीने आंदोलन करण्यात येउन नगरपंचायतच्या खुर्चीचे अंत्यसंस्कार करण्यात येऊन कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा दिला आहे. यावेळी राजू पगार, अनिल बधान, सागर पगार, राकेश पगार, बंडू पगार, अशोक शिंदे, नाना काकुळते, प्रमोद शिंदे, समाधान शिंदे, स्वप्नील पगार, चेतन पगार, टिनू पगार आदिंसह नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते. (वार्ताहर )