शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

मॅरेथॉन मध्ये नाचलोढीचा दबदबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 17:30 IST

कसबे सुकेणे : येथील छत्रपती शिवाजी महाराज संस्कृतिक कला व क्र ीडा मंडळ आणि सुंदरी क्रि केट क्लब आयोजित स्वर्गीय माधवराव पिहलवान जाधव क्र ीडा महोत्सवास प्रारंभ झाला असून येत्या बुधवारी उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्तीचा थरार रंगणार आहे. अशी माहिती संयोजक बाळासाहेब जाधव व उपसरपंच छगन जाधव यांनी दिली.

ठळक मुद्देकसबे सुकेणे : बुधवारी उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्तीचा थरार

कसबे सुकेणे : येथील छत्रपती शिवाजी महाराज संस्कृतिक कला व क्र ीडा मंडळ आणि सुंदरी क्रि केट क्लब आयोजित स्वर्गीय माधवराव पिहलवान जाधव क्र ीडा महोत्सवास प्रारंभ झाला असून येत्या बुधवारी उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्तीचा थरार रंगणार आहे. अशी माहिती संयोजक बाळासाहेब जाधव व उपसरपंच छगन जाधव यांनी दिली.गेल्या सात वर्षांपासून कसबे सुकेणे येथे राज्यपातळीवरील क्र ीडा महोत्सव होत असून क्रि केट, कब्बडी, मॅरेथॉन आणि उत्तर महाराष्टÑ केसरी किताब कुस्ती हे प्रमुख आकर्षण आहे. स्वर्गीय माधवराव जाधव पहिलवान चषक क्रि केट स्पर्धेसाठी राज्यभरातील नामवंत संघ सहभागी होत असून प्रथम पारितोषिक ३१ हजार, व्दितीय २१ हजार, तृतीय ११ हजार तर चतुर्थ ७ हजार रु पये तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, यष्टीरक्षक व सामनावीर या गटातही मोठ्या प्रमाणात बक्षिसे ठेवण्यात आली आहे.येत्या बुधवारी (दि.२६) उत्तर महाराष्टÑ केसरी कुस्ती स्पर्धा होत असून कुमार, वरिष्ठ व महिला गटात या स्पर्धा होत आहे. स्वर्गीय माधवराव पहिलवान उत्तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक २१ हजार व गदा तर द्वितीय पारितोषिक ११ हजार रु पये आहे. याशिवाय प्रत्येक वजनी गटात प्रथम, व्दितीय बक्षिसे दिली जाणार आहे. या निमित्ताने छत्रपती राजे संभाजी महाराज मैदान गजबजले असून प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी खास आसनव्यवस्था करण्यात आली आहे. अशी माहिती त्यांनी दिली.मॅरेथॉनचा शुभारंभ कसबे सुकेणे झाला. जिल्हा परिषद सदस्य दीपक शिरसाठ, बाळासाहेब जाधव, भाऊराज उगले, लक्ष्मण काळे, विश्वास भंडारे, अशोक भंडारे, संतोष काळे, संतोष प्रसाद, अमोल उगले, संतोष भालेराव, विजय भालेराव, संदीप वाळवे, सतीश बोंबले, सुनील गोटरने, पद्माकर पिंगळ, अनिल जाधव, विजय जाधव, राजेंद्र भंडारे, चिंतामण जाधव आदी यावेळी उपस्थित होते.मॅरेथॉन मध्ये नाचलोढी चा दबदबाक्रीडा महोत्सव शुभारंभ जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेने झाला. बसस्थानक चौकातून सुरु झशलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेत नाचलोढी येतील धावपटूचा प्रत्येक गटात दबदबा कायम राहिला, तर मॅरेथॉन इगतपुरीच्या कमळु कल्लू लोते याने सात किलोमीटर अंतर २२ मिनिटे ५ सकंदात पार करीत जिंकली.१४ वर्ष मुलांच्या गटात नाचलोढीचे सुरेश चौधरी (प्रथम), अनिल चौधरी (व्दितीय) तर अजय यादव-घनशेत (तृतीय), याच गटात मुलींमध्ये नाचलोढीची भारती चौधरी (प्रथम), सानिका चौधरी (द्वितीय) तर रेखा शिंगाडे (तृतीय), १६ वर्ष गटात मुलांमध्ये वसंता चौधरी (प्रथम), संदीप चौधरी व्दितीय), रवींद्र चौधरी- तृतीय) सर्व नाच लोढी, याच गटात मुलींमध्ये रविना चौधरी (प्रथम), कावरी सहारे (व्दितीय) दीक्षा शिताड (तृतीय), सात किलोमीटर खुल्या वयोगटात मुलांमध्ये कमळु कल्लू लोते-मालोजेवाडी ता. इगतपुरी (प्रथम), दिनकर गुलाब महाले - गणेशगाव (त्र्यंबकेश्वर) (व्दितीय) तर रोहिदास किसन भोंबे - नाचलोढी (तृतीय). मुलींच्या खुल्या गटात ३ किलोमीटर मध्ये सुशीला चौधरी (प्रथम), वनिता झोंबे (व्दितीय) सरस्वती चौधरी ( तृतीय) - सर्व नाचलोढी यांनी यश मिळविले.