शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

नागपंचमीची परंपरा पावतेय लोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 00:58 IST

नाशिक : ‘चल गं सखे वारूळाला, नागोबा पूजायला’ अशी गाणी म्हणत, फुगड्या, झिम्मा खेळत झाडाला झोके बांधून नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्याची प्रथा भारतीय संस्कृतीत हजारो वर्षांपासून सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : ‘चल गं सखे वारूळाला, नागोबा पूजायला’ अशी गाणी म्हणत, फुगड्या, झिम्मा खेळत झाडाला झोके बांधून नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करण्याची प्रथा भारतीय संस्कृतीत हजारो वर्षांपासून सुरू आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून ही परंपरा लोप पावत असल्याचे दिसते. श्रावण शुद्ध पंचमीला हा सण साजरा करण्यात येतो. वाढत्या शहरीकरणामुळे वारूळे नष्ट झाल्याने शहरी भागात काही ठिकाणी केवळ घरच्या घरी नागनरसोबाच्या चित्राची पूजा करण्यात येते. ग्रामीण भागात काही प्रमाणात आता केवळ जुन्या पिढीकडूनच हा सण साजरा करण्यात येतो. नव्या पिढीमध्ये या सणाबद्दल फारशी जागृती दिसत नाही.भारतीय संस्कृतीत पशुपक्ष्यांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांची पूजा करण्याची प्रथा आहे. शेतीचे उंदरांपासून रक्षण करणाऱ्या नागासाठी नागपंचमी हा सण साजरा करण्यात येतो. या सणाबद्दल पुराणकाळापासून अनेक कथा आहेत. आपला देश कृषिप्रधान असल्याने शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागाचे नागपंचमीला पूजन करण्याची प्रथा आहेत. परंतु कालौघात सापांबद्दल अनेक गैरसमज निर्माण झाल्याने नागासह सापांच्या अनेक जाती नष्ट झाल्या.  ग्रामीण भागात सापांबद्दल अनेक गैरसमज असल्याने सर्पमित्रांकडून प्रबोधन करण्यात यावे, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. कारण साप चावण्याच्या घटना पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर घडतात. वेळीच वैद्यकीय उपचार करण्याऐवजी लोक बुवा बाबा व मांत्रिकाकडे जातात. त्यामुळे साप चावलेल्या व्यक्तींचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे साहजिकच कोणताही साप दिसल्यावर तो विषारी साप समजून त्याला ठार मारले जाते. वास्तविक सर्पमित्रमांकडून कोणता साप विषारी आणि कोणता बिनविषारी यासंबंधी नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर प्रबोधन झाल्यास सापांचा जीव वाचून पर्यावरणाचे रक्षण होईल, अशी अपेक्षा पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त करण्यात आली आहे.