नाशिक : किरकोळ कारणावरून चौघा संशयितांनी मायलेकरास शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना रविवारी (दि़२) दुपारी पंचवटी पेठरोडवरील पवार चाळीत घडली़ पंचवटी पोलीस ठाण्यात संजय अण्णा पवार (३७, रा़रामनगर गार्डनजवळ, पवार चाळ, पेठरोड) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित बाळू हिरामण धोत्रे, विशाल बाळू धोत्रे, संतोष रामू पवार, शंकर रामू पवार हे चौघे दुपारी ३ वाजेच्या सुमारास घराजवळ आले व शिवीगाळ सुरू केली़ यानंतर बाळू धोत्रे याने मी तुझ्या भावाला चाकू मारला होता का, असे म्हणत सर्वांनी संजय पवार यांना लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी दांडक्याने मारहाण केली़ दरम्यान, पवार यांची आई भांडण सोडविण्यासाठी गेली असता तिलाही लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली़याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात चौघा संशयितांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पेठरोडवर चौघा संशयितांकडून मायलेकरास मारहाण
By admin | Updated: April 3, 2017 18:43 IST