वणी : दिंडोरी तालुक्यातील परमोरी येथील कंपनीतून ठाणे जिल्ह्यात २५ लाख ७० हजार ३०६ रुपयांचे मद्य नियोजित ठिकाणी न पोहोचविता त्याची परस्पर विल्हेवाट लावल्याप्रकरणी दोन संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.परमोरी शिवारातील युनायटेड स्पिरीट लिमिटेड या कंपनीतील व्यवस्थापक तन्वीर शेख यांनी १४ जानेवारी रोजी नाशिकच्या महाराष्ट्र रोडलाइन्स ट्रान्स्पोर्ट कंपनीत फोन केला. ठाणे जिल्ह्यातील कोणगाव येथे विविध प्रकारचे मद्य पोचवायचे असल्याचे त्यांनी दूरध्वनीव्दारे सांगितले. (वार्ताहर)चौकशीत असमाधानकारक उत्तरेमहाराष्ट्र रोडलाइन्सचे संचालक प्रशांत जाधव यांनी पंचवटीतील श्री स्वामी समर्थ रोड लाइन्स यांना हा मालवाहतूक करण्यास सांगितले. एमएच १३ एएक्स २९८८ या ट्रकमधून पंचवीस लाख सत्तर हजार तीनशे सहा रुपयांचे मद्य नियोजित ठिकाणी पाठविण्याचे ठरले असताना ते संबंधित ठिकाणी पोहोचलेच नसल्याची माहिती जाधव यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी ट्रान्स्पोर्ट मालकाकडे याबाबत चौकशी केली असता त्यांना समाधानकारक माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार रमजान रफिक चौधरी, रा. साकीनाका, मुंबई, मूळ रा. उत्तर प्रदेश हा चालक व वाहनमालक अझरूद्दीन सादिक शेख, जुने नाशिक यांच्या विरुद्ध २६ लाख रुपयांच्या ऐवजाची परस्पर विल्हेवाट लावण्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
२५ लाखांच्या मद्याची परस्पर विल्हेवाट
By admin | Updated: January 19, 2017 01:18 IST