शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

धोरणात्मक प्रस्तावांना परस्पर मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 17:06 IST

नाशिक : मागील महिन्यात (दि.२० सप्टेंबर) झालेल्या महासभेत महत्त्वपूर्ण अशा काही धोरणात्मक प्रस्तावांवर पुढील महासभेत चर्चा करण्याचा निर्णय महापौरांनी दिलेला असतानाही केवळ दोनच प्रस्ताव येत्या सोमवारी (दि.१६) होणाºया महासभेत पुन्हा मांडण्यात येणार आहे. त्यामुळे महासभेत विरोधक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. तसे संकेतही विरोधी पक्षाने दिले आहे. दरम्यान, सभागृहात चर्चा ...

नाशिक : मागील महिन्यात (दि.२० सप्टेंबर) झालेल्या महासभेत महत्त्वपूर्ण अशा काही धोरणात्मक प्रस्तावांवर पुढील महासभेत चर्चा करण्याचा निर्णय महापौरांनी दिलेला असतानाही केवळ दोनच प्रस्ताव येत्या सोमवारी (दि.१६) होणाºया महासभेत पुन्हा मांडण्यात येणार आहे. त्यामुळे महासभेत विरोधक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे. तसे संकेतही विरोधी पक्षाने दिले आहे. दरम्यान, सभागृहात चर्चा न करताच अनेक प्रस्तावांना परस्पर मंजुरी दिल्याने विरोधकांनी त्यावर यापूर्वीच आयुक्तांना पत्र देऊन आक्षेप घेतलेला आहे.दि. २० सप्टेंबर रोजी झालेल्या महासभेत विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते व भाजपा गटनेता संभाजी मोरुस्कर यांनी साथरोगाबद्दल लक्षवेधी दिली होती. या लक्षवेधीवर सात तास चर्चा चालली. त्यामुळे महापौरांनी विषयपत्रिकेसह जादा विषयांमधील विकासकामांचे प्रस्ताव मंजूर केले आणि धोरणात्मक चर्चेचे विषय पुढील महासभेत घेण्याचे जाहीर केले होते. मात्र, महापौर व भाजपा गटनेत्यांनी पत्रकारांशी बोलताना महासभेतील आयुक्तांचे सर्व विषय मंजूर झाल्याचे स्पष्ट करत त्यात धोरणात्मक विषयही असल्याचे मान्य केले होते. त्याला विरोधकांनी आक्षेप घेतला होता. महासभेत प्रामुख्याने, उद्यान निरीक्षकांची भरती करणे (प्रस्ताव क्रमांक ५५४), भूमिगत गटारीसाठी डीपीआर तयार करणे (प्रस्ताव क्रमांक ५५५), कार्यकारी अभियंता गौतम पगारे यांची स्वेच्छानिवृत्ती (प्रस्ताव क्रमांक ५६१), वैद्यकीय विभागात विविध संवर्गातील पदांची भरती (प्रस्ताव क्रमांक ६२८), महापालिकेत शस्त्रधारी सुरक्षारक्षकांची नेमणूक करणे (प्रस्ताव क्रमांक ६७८), वैद्यकीय विभागामार्फत कोट्यवधी रुपयांची औषध खरेदी (प्रस्ताव क्रमांक ६८२ ते ६८८), पाणीपट्टी बिल वाटपाचे आउटसोर्सिंग करणे (प्रस्ताव क्रमांक ७०५) आणि सुमारे ३७ कोटी रुपयांचे रस्ते डांबरीकरण (प्रस्ताव क्रमांक ७३४ व ७३५) या धोरणात्मक प्रस्तावांचा समावेश होता. परंतु, महासभेत या प्रस्तावांवर कसलीही चर्चा न होता सदर प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचे महापौर व भाजपा गटनेत्यांनी सांगितल्याने विरोधकांनी त्याला आक्षेप घेतला होता. आता येत्या सोमवारी (दि.१६) होणाºया महासभेत या धोरणात्मक प्रस्तावांतील उद्यान निरीक्षकांची भरती करणे व पाणी बिल वाटपाचे आउटसोर्सिंग करणे हे दोनच प्रस्ताव पुन्हा ठेवण्यात येणार आहेत तर अन्य प्रस्तावांना परस्पर मंजुरी दिल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे, महासभेत विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.