शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
4
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
5
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
6
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
7
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
8
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
9
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
10
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
11
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
12
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
13
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
14
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
15
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
16
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
17
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
18
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
19
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
20
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?

मनमाड येथे मुस्लीम महिलांचा मूक मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 01:06 IST

मनमाड : केंद्र शासनाने आणलेल्या तिहेरी तलाक विधेयकाविरोधात मनमाड शहरातील मुस्लीम महिलांनी मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डच्या मार्गदर्शनाखाली मूक मोर्चा काढून निषेध नोंदवला. सदरचे विधेयक रद्द करण्यात यावे यांसह अन्य मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.

ठळक मुद्देतिहेरी तलाक विधेयक रद्दची मागणी मंडल अधिकारी चौधरी व पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना मागण्यांचे निवेदन

मनमाड : केंद्र शासनाने आणलेल्या तिहेरी तलाक विधेयकाविरोधात मनमाड शहरातील मुस्लीम महिलांनी मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डच्या मार्गदर्शनाखाली मूक मोर्चा काढून निषेध नोंदवला. सदरचे विधेयक रद्द करण्यात यावे यांसह अन्य मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले.गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने संसदेत आणलेल्या तिहेरी तलाकबंदी विधेयकाचा निषेध व्यक्त करण्यासाठी शहरातील मुस्लीम समाजाच्या महिलांनी येथील जामा मशिदीपासून मूक मोर्चा काढला. ‘तिहेरी तलाक बिल वापस लो, इस्लामी शरिअत हमारा सन्मान है, हम कानून-ए-शरिअत के बाध्य है’ आदी आशयांचे असंख्य फलक हाती घेऊन महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या.शहरातील विविध भागातून व प्रमुख मार्गांवरून मोर्चा एकात्मता चौकात पोहचला. येथे निषेध सभेचे आयोजन करण्यात आले होते.मोर्चात सहभागी झालेल्या मुस्लीम महिलांनी यावेळी भर उन्हात बसून निषेध सभेत सहभाग नोंदवला. इस्लामी शरिअत आमचा सन्मान असल्याकडे लक्ष वेधत संसदेत आणलेले ‘तिहेरी तलाकबंदी विधेयक’ केंद्र सरकारने मागे घ्यावे, अशी मागणी करण्यात आली. मंडल अधिकारी चौधरी व पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.