शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

मुस्लीम बांधवांचा मूक मोर्चा

By admin | Updated: March 7, 2017 23:26 IST

मनमाड : येथील येवला रोडवरील कॅम्प विभागातील जुने धार्मिक स्थळ सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेवरून मनमाड पालिकेने प्रचंड पोलीस बंदोबस्तात हटविले.

मनमाड : येथील येवला रोडवरील कॅम्प विभागातील जुने धार्मिक स्थळ सुप्रीम कोर्टाच्या आदेशान्वये जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेवरून मनमाड पालिकेने प्रचंड पोलीस बंदोबस्तात हटविले. न्यायालयाच्या निर्णयाला विरोध नसला तरी पालिका प्रशासनाने केलेल्या कार्यवाहीच्या चुकीच्या पद्धतीमुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत शहरातील मुस्लीम बांधवांच्या वतीने मंगळवारी मनमाड बंदची हाक देण्यात आली होती. या कारवाई विरोधात शहरातून मूक मोर्चा काढून निषेध करण्यात आला.येथील येवला रोडवरील धार्मिक स्थळ काढण्याची कारवाई पालिका प्रशासन, तहसीलदार, शहर पोलीस, रेल्वे पोलीस यांच्या प्रचंड बंदोबस्तात करण्यात आली. सदरचे स्थळ हटवताना कुठल्याही प्रकारे धार्मिक विधी व सोपस्कार न करता भावना दुखावल्या जातील, अशी कारवाई केली असल्याची तक्रार मुख्याधिकारी, तहसीलदार, बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता यांच्या विरोधात मनमाड शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या तक्रारीची दखल घेऊन कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी शहरातील मुस्लीम बांधवांच्या वतीने मंगळवारी मनमाड बंदची हाक देण्यात आली होती. या बंदमुळे दैनंदिन व्यवहार ठप्प होऊन शहराच्या मुख्य बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत होता. येथील जामा मशिदीपासून काढण्यात आलेल्या मूक मोर्चामध्ये मोठ्या संख्येने मुस्लीम बांधव सहभागी झाले होते. शहराच्या मुख्य मार्गावरून निघालेल्या या मोर्चाचा समारोप एकात्मता चौकात करण्यात आला. पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी शहर काजी असलम मौलाना, हाजी शब्बीर साहब, अ‍ॅड. मिर कासीम अली, मौलाना सहीद, मौलाना कमरुद्दीन, मौलाना मुजम्मील, अलताफ खान, जाफर मिर्झा, जुबेर शेख, अकील शेख, सय्यद एयाज, सय्यद कयाम यांच्यासह असंख्य मुस्लीम बांधव उपस्थित होेते. (वार्ताहर)