शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

मुसळगाव पोलीस ठाण्याला हक्काची इमारत मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 15:09 IST

सिन्नर: गेल्या काही वर्षांपासून भाड्याच्या जागेत कामकाज सुरू असलेल्या मुसळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याला हक्काची इमारत मिळणार आहे. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या पाठपुराव्यातून एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या इमारत बांधकामासाठी ४ कोटी ४२ लाखांची प्रशासकीय मान्यता मिळाली असून त्यापैकी चालू आर्थिक वर्षात संभाव्य खर्चासाठी २ कोटींचा निधी शासनाने मंजूर केला आहे.

ठळक मुद्दे सिन्नर: 4 कोटी 42 लाख निधी

सिन्नर: गेल्या काही वर्षांपासून भाड्याच्या जागेत कामकाज सुरू असलेल्या मुसळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याला हक्काची इमारत मिळणार आहे. आमदार माणिकराव कोकाटे यांच्या पाठपुराव्यातून एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या इमारत बांधकामासाठी ४ कोटी ४२ लाखांची प्रशासकीय मान्यता मिळाली असून त्यापैकी चालू आर्थिक वर्षात संभाव्य खर्चासाठी २ कोटींचा निधी शासनाने मंजूर केला आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने सर्वच विभागांची बांधकामे आणि इतर कामांवर बंदी घातली आहे. तसा आदेशही राज्य शासनाने पारित केला आहे. त्यामुळे सर्वच विभागांची कामे ठप्प झाली आहेत. असे असताना या निर्णयातून पोलीस ठाण्याच्या प्रशासकीय इमारती तसेच पोलिस निवासस्थानाच्या इमारत बांधकामांना या निर्णयातून सूट मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी राज्य शासनाकडे विनंती केली होती. त्याची दखल घेत राज्य शासनाने राज्यातील पोलीस ठाणे पोलीस कर्मचार्‍यांच्या निवासस्थानांच्या १४ विकासकामांसाठी मंजुरी दिली आहे. त्यात सिन्नर तालुक्यातील मुसळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या इमारत बांधकामाचा समावेश आहे. या कामासाठी ४ कोटी ४२ लाखांचा अंदाजित खर्च अपेक्षित असून २०२०-२१ या वित्तीय वर्षात या बांधकामासाठी २ कोटींच्या निधी खर्चास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी स्वप्निल बोरसे यांच्या स्वाक्षरीने हा आदेश पारित झाला आहे. त्यामुळे मुसळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याला हक्काची इमारत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

टॅग्स :Police Stationपोलीस ठाणेsinnar-acसिन्नर