शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

खून करणाऱ्या दोघांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 01:15 IST

नाशिक : केवळ भुंकल्याच्या किरकोळ कारणावरून कुत्र्याचा जीव का घेतला याचा जाब विचारला म्हणून हरसूलच्या राजेवाडी शिवारातील सहादू अमृता टोपले (५५) यांना काठीने जबर मारहाण करून खून करणारे आरोपी रावजी आवजी टोपले (४९) व सुभाष देवराम टोपले (४१, रा़ राजेवाडी शिवार, हरसूल़ ता़ त्र्यंबकेश्वर) यांना जिल्हा न्यायाधीश यू़ एम़ नंदेश्वर यांनी बुधवारी (दि़३) जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ विशेष म्हणजे या खुनातील आरोपींपर्यंत पोहोचण्याचे काम ग्रामीण पोलीस दलातील ‘टायगर’ या श्वानाने केली होती़ सरकारी वकील दीपशिखा भिडे -भांड यांनी न्यायालयात खून खटल्यातील वैद्यकीय पुरावे, डीएनए अहवाल, श्वान विभागाने केलेला तपास व पुरावे सादर केले होते़

ठळक मुद्देकुत्रा भुंकल्याचे कारण : राजेवाडी शिवारातील घटना

नाशिक : केवळ भुंकल्याच्या किरकोळ कारणावरून कुत्र्याचा जीव का घेतला याचा जाब विचारला म्हणून हरसूलच्या राजेवाडी शिवारातील सहादू अमृता टोपले (५५) यांना काठीने जबर मारहाण करून खून करणारे आरोपी रावजी आवजी टोपले (४९) व सुभाष देवराम टोपले (४१, रा़ राजेवाडी शिवार, हरसूल़ ता़ त्र्यंबकेश्वर) यांना जिल्हा न्यायाधीश यू़ एम़ नंदेश्वर यांनी बुधवारी (दि़३) जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ विशेष म्हणजे या खुनातील आरोपींपर्यंत पोहोचण्याचे काम ग्रामीण पोलीस दलातील ‘टायगर’ या श्वानाने केली होती़ सरकारी वकील दीपशिखा भिडे -भांड यांनी न्यायालयात खून खटल्यातील वैद्यकीय पुरावे, डीएनए अहवाल, श्वान विभागाने केलेला तपास व पुरावे सादर केले होते़६ मार्च २०१५ रोजी राजेवाडी शिवारातील दारूच्या झापावरून सहादू टोपले हे आपल्या राजा नावाच्या कुत्र्यासोबत घरी जात होते़ यावेळी आरोपी रावजी टोपले व सुभाष टोपले हे समोरून येत असताना त्यांच्यावर कुत्रा भुंकला तसेच चावा घेतल्याने त्यांनी कुत्र्यास मारून टाकले़ याबाबत सहादू टोपले यांनी या दोघांकडे विचारणा केली असता त्यांनी काठीने डोके व तोंडावर जबर वार करून खून केला़ यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी सहादू टोपले यांचा मृतदेह सावरदरा पाणर तलावाजवळ नेऊन ३५ किलोचा दगड बांधून पाण्यात फेकून दिले़ तपास सहायक पोलीस निरीक्षक आऱ बी़ कीर्तीकर यांनी केला़ आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी सहायक पोलीस निरीक्षक संजय आहेर व पोलीस नाईक संतोष गोसावी यांनी मदत केली़ ग्रामीण पोलिसांनी खुनाची उकल करण्यासाठी श्वान विभागाची मदत घेतली होती़ श्वान विभागातील सहायक पोलीस उपनिरीक्षक व टायगर या श्वानाचे हँडलर एऩ बी़ बघे यांनी दारूच्या झापापासून गंध दिल्यानंतर ते दोन्ही आरोपींच्या घरी पोहोचून आरोपींवर भुंकले होते़ तसेच मयत टोपले यांचा मृतदेह नेत असताना पडलेले रक्त, बूट व दात हे पुरावेही टायगरने शोधून काढले होते़ त्यानंतर पाझर तलावातून सहादू टोपले यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला होता़ न्यायाधीश नंदेश्वर यांनी सरकारी वकिलांनी घेतलेले साक्षीदार व पुरावे ग्राह्य धरून आरोपींना शिक्षा सुनावली़