शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

तिबेटियन मार्केट येथील खून प्रकरणी दोघांना जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 01:07 IST

पाप्या शेरगीरच्या खुनाचा बदला घेण्याच्या उद्देशाने त्याचा भाऊ हरिश राजू शेरगील ऊर्फ हऱ्या (२२, रा.फुलेनगर), ललित सुरेश राऊत ऊर्फ लल्या (१९ दोघे रा. फुलेनगर) यांच्यासह चार विधीसंघर्षित बालकांनी चेतन पवार (१७) याच्यावर तिबेटियन मार्केटमध्ये सशस्त्र हल्ला करून खून केल्याची घटना १९ आॅगस्ट २०१७ घडली होती. या खून खटल्याप्रकरणी न्यायालयाने दोघांना जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा गुरुवारी (दि,१७) सुनावली.

नाशिक : पाप्या शेरगीरच्या खुनाचा बदला घेण्याच्या उद्देशाने त्याचा भाऊ हरिश राजू शेरगील ऊर्फ हऱ्या (२२, रा.फुलेनगर), ललित सुरेश राऊत ऊर्फ लल्या (१९ दोघे रा. फुलेनगर) यांच्यासह चार विधीसंघर्षित बालकांनी चेतन पवार (१७) याच्यावर तिबेटियन मार्केटमध्ये सशस्त्र हल्ला करून खून केल्याची घटना १९ आॅगस्ट २०१७ घडली होती. या खून खटल्याप्रकरणी न्यायालयाने दोघांना जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा गुरुवारी (दि,१७) सुनावली.याबाबत सविस्तर माहिती अशी, पाप्या शेरगीर याच्या खून खटल्यात संशयित विधीसंघर्षित बालक चेतन पवार यास २०१७ साली फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे हजर केले होते. न्यायालयाने त्यास जामीन मंजूर केला. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी चेतनसमवेत शहरातून मुळ गावी डहाणू तालुक्यातील मूळ गाव दुबलपाड्याला स्थलांतर केले.न्यायालयाच्या सुनावणीसाठी आई-वडिलांनी चेतनला १९ आॅगस्ट २०१७ रोजी शहरात आले होते.या आरोपींनी अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने सशस्त्र हल्ला चढवून चेतनला ठार मारल्याचे फिर्यादित म्हटले आहे. सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहायक निरीक्षक विलास शेळके यांनी करत विविध सबळ पुरावे न्यायालयापुढे सादर केले. सरकारपक्षाकडून अ‍ॅड. रवींद्र निकम यांनी युक्तिवाद केला. फिर्यादी चेतनचे वडिलांसह पंच, साक्षीदारांची साक्ष महत्त्वाची ठरली. परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून करण्यात आलेला युक्तिवाद व सबळ पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने हºया, लल्या यांना दोषी धरत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.—इन्फो-आई-वडिलांसमोर केले ठारचेतन यास वडील संजय रामलाल पवार व आई सविता पवार यांनी तिबेटियन मार्केट येथे कपडे खरेदीसाठी घेऊन गेले. यावेळी चेतन व त्याचा भाऊ स्वप्नील हे एका दुकानात कपडे बघत होता तर त्याचे आई-वडील जवळच टपरीवर चहा घेत होते. या दरम्यान, हºया व लल्या यांनी हल्ला चढविला. हल्ल्यातून चेतन पळून जाण्यास यशस्वी झाला असता काही अंतरावर पुन्हा त्याचा पाठलाग करून चेतनला खाली पाडून शस्त्राने वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या चेतनला त्याच्या आई-वडिलांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता त्याला डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.

टॅग्स :NashikनाशिकCourtन्यायालय