वणी : घर बांधण्यासाठी माहेरून पैसे आणण्याची मागणी करून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून मारहाण करत शेतातील विहिरीत फेकून जीवे ठार मारल्याची फिर्याद विवाहितेच्या काकाने दिल्याने पती, सासरा, सासू व नणंद यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, संशयिताना अटक करण्यात आली आहे. निफाड तालुक्यातील वावी ठुशी येथील सोनाली यांचा विवाह २०११ साली दिंडोरी तालुक्यातील जोपूळ येथील भगवान उगले यांचेशी झाला. लग्नात हुंडा स्वरूपात एक लाख रुपये व सोन्याचे दागिने दिले होते. काही कालावधीनंतर अपत्य होत नसल्याने सोनालीचा मानासिक व शारीरिक छळ सुरू झाला. तद्नंतर २०१४ साली मुलीच्या स्वरूपात सोनालीला अपत्य झाले. यानंतर सोनालीला त्रास वाढला व पती व्यसनाधीन झाला. सोनाली माहेरी निघून गेली. सासरच्या मंडळीनी तिची समजूत काढली व हमी घेतली व सोनालीला पुन्हा सासरी आणण्यात आले. काही दिवसानंतर पहिले पाढे पंचावन्न सुरू झाले. दि. ११ आॅगस्ट रोजी सोनाली बेपत्ता असल्याचे सासऱ्यांनी सोनालीच्या विडलांना कळविले. ते जोपु ळ येथे आले माहेरच्या सदस्यांनी शेत जमिनीच्या विहिरीच्या वरील बाजुस सोनालीची पादत्राने बघितली तिने बरेवाईट केल्याच्या संशयामुळे एका युवकाला विहिरीत उतरविण्यात आले मात्र तेव्हा काही आढळुन आले नाही. सायंकाळी वणी पोलीसात सोनाली बेपत्ता झाल्याची फिर्याद नोंदविण्यात आली. १२आॅगष्ट रोजी त्या विहिरीत पिपंळगाव ग्रामपालिकेच्या अग्नीशमन दलाचे कर्मचारी व पोलीस विहिरीत उतरले त्यांनी शोध घेतला असता सोनालीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळुन आला. सोनालीच्या काकांनी सोनालीचा खुन पती भगवान उदध्व उगले ,सासरा उदध्व बाबुराव उगले, सासु निर्मला उदध्व उगले, नणंद अनिता उदध्व उगले यांनी केल्याची फिर्याद दाखल केल्याने या चार संशयीतांविरोधात हुंड्यासाठी शारिरीक व मानासीक छळ करून संगनमताने जीवे ठार मारल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान शवविच्छेदनानंतर व्हीसेरा राखुन ठेवण्यात आला आहे. मृतदेहावर जोपुळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिस उपअधिक्षक देविदास पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. (वार्ताहर )
जोपूळ येथील विवाहितेचा खून
By admin | Updated: August 13, 2016 00:18 IST