शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

जंगली श्वापदाच्या हल्ल्यात बकरी ठार

By admin | Updated: April 7, 2017 00:58 IST

लोहोणेर : येथील एका शेतकऱ्याच्या मालकीची बकरी जंगली श्वापदाने फस्त केल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती व्यक्त केली जात असून, या श्वापदांचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

लोहोणेर : येथील एका शेतकऱ्याच्या मालकीची बकरी जंगली श्वापदाने फस्त केल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती व्यक्त केली जात असून, या श्वापदांचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात येत आहे. लोहोणेर परिसरातील काळवट धरण शिवारातील शेतकरी मधुकर मोहन सोनवणे यांच्या मालकीची सुमारे ४ ते ५ हजार रुपये किमतीची बकरी मंगळवारी पहाटे ४ वाजेच्या सुमारास जगली श्वापदाने शेजारील कांद्याच्या शेतात नेऊन फस्त केली. सकाळी उठल्यानंतर बाहेर बांधलेल्या तीन बकऱ्यांपैकी एक बकरी गायब असल्याचे सोनवणे कुटुंबाच्या लक्षात आले. त्यांनी आजूबाजूला पाहणी केली असता त्यांच्या मालकीच्या कांद्याच्या शेतातील पीक जमिनीवर पडलेले दिसले व काही ठिकाणी या जगली श्वापदाच्या पावलाचे ठसे तर बकरीचे रक्तही पडलेले दिसले. परिसरातील काही शेतकऱ्यांनी बिबट्याचे अथवा वाघाचे दर्शनही झाले असून, ही श्वापदे जोडीने या भागात वावरत असल्याचे या परिसरातील शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे या परिसरातील शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या दोन दिवसापूर्वी लोहोणेर येथील युवक कैलास शेवाळे हे मालेगाव येथून येत असताना लोहोणेर परिसरात या जगली श्वापदांनी दर्शनही दिल्याचे सांगितले. (वार्ताहर)