शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
4
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
5
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
6
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
7
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
8
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
9
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
10
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
11
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
12
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
13
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
14
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
15
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
18
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
19
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
20
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
Daily Top 2Weekly Top 5

भालूर रस्त्यावरील हत्त्येचा गुन्हा उघड

By admin | Updated: January 16, 2017 00:57 IST

मनमाड : स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

मनमाड : मनमाड-भालूर रस्त्यालगत सटाणे शिवारात एका अनोळखी इसमाची दगडाने ठेचून हत्त्या केल्याच्या घटनेचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश मिळाले असून संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून, अनोळखी मयताची ओळख पटली आहे.भालूर रस्त्यावरील शिवनेरी हॉटेलच्या जवळील नाल्यात एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. मयताचा गळा चिरून व दगडाने ठेचून हत्त्या केली असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी मनमाड शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हा अधीक्षक अंकुश शिंदे, अपर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शन व सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांच्या पथकाने समांतर तपास सुरू केला. घटनेच्या दिवशी कऱ्ही गावाकडील रस्त्यावर दोन इसम दारूच्या नशेत पायी जात असल्याची माहिती पथकाला मिळाली. या गावात शेततळ्याच्या कामासाठी काही मजूर आले होते. याबाबत चौकशी करून पोलिसांनी वडनेर खाकुर्डी, ता. मालेगाव येथून संशयित आरोपी महेंद्र निंबा सोनवणे (२७) यास ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखविताच त्याने मयतास जिवे ठार मारल्याची कबुली दिली. मयत भाऊसाहेब दशरथ चव्हाण (४५) रा. धोडंबे, ता. चांदवड हा मिस्त्री काम करत होता. मुलीसाठी मुंबई येथून स्थळ पाहून आल्यानंतर मनमाड येथे आरोपीशी त्याची भेट झाली. त्याच्या खिशात असलेले पैसे पाहून त्यास दारू पाजून अज्ञात ठिकाणी नेऊन जिवे ठार मारल्याची कबुली सोनवणे याने दिली. आरोपीकडून एक धारधार कटर, रोख रुपये व मोबाइल हस्तगत करण्यात आले असून, पुढील तपासासाठी मनमाड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, उपनिरीक्षक बालाजी मुसळे, भरत चौधरी, अरुण पगारे, सतीश जाधव, किरण मोरे, विलास शिरोळे, सुहास छत्रे, सुनील अहिरे, राजू मोरे, भरत कांदळकर, गणेश नरोटे यांच्या पथकाने सदरची कार्यवाही केली. (वार्ताहर)