शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
5
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
6
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
7
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
8
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
9
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
10
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
11
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
12
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
13
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
14
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
15
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
16
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
17
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
18
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
19
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
20
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली

पालिका खूश ना व्यापारी एलबीटीची वर्षपूर्ती : उत्पन्नाअभावी शहर विकास धोक्यात

By admin | Updated: May 21, 2014 00:25 IST

नाशिक : जकातीला पर्याय म्हणून राज्य शासनाने गेल्या वर्षी स्थानिक संस्था कराचा (एलबीटी) पर्याय दिला. त्यातून जकातीच्या तुलनेत अधिक उत्पन्न मिळेल असे दावेही केले गेले. प्रत्यक्षात जकातीएवढे उत्पन्न तर मिळालेच नाही; परंतु ज्या व्यापारी आणि उद्योजकांसाठी हा पर्याय स्वीकारला तेही खूश नाहीत आणि महापालिकाही. त्यामुळे हा कर लावून भले तरी कोणाचे झाले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

नाशिक : जकातीला पर्याय म्हणून राज्य शासनाने गेल्या वर्षी स्थानिक संस्था कराचा (एलबीटी) पर्याय दिला. त्यातून जकातीच्या तुलनेत अधिक उत्पन्न मिळेल असे दावेही केले गेले. प्रत्यक्षात जकातीएवढे उत्पन्न तर मिळालेच नाही; परंतु ज्या व्यापारी आणि उद्योजकांसाठी हा पर्याय स्वीकारला तेही खूश नाहीत आणि महापालिकाही. त्यामुळे हा कर लावून भले तरी कोणाचे झाले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.देशभरात फक्त महाराष्ट्रातच जकात असल्याने हा कालबा‘ कर आता रद्द करावा यासाठी गेल्या काही वर्षांपासून व्यापारी आणि उद्योजक संयुक्त लढा देत होते. त्यातच नाशिकसारख्या अनेक ठिकाणी जकात वसुलीचे ठेके देण्यात आल्याने व्यापारी आणि उद्योजकांना ठेकेदाराच्या दंडुकेशाहीला सामोरे जावे लागले. त्यामुळे जकात रद्दच्या मागणीने अधिकच जोर धरला. अशावेळी राज्य शासनाने सोलापूरसारख्या ठिकाणी विरोध असणारा कर संपूर्ण राज्यभरातील महापालिकांना लागू केला. नाशिक महापालिकेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने नाशिक महापालिका हद्दीत २१ मे रोजी एलबीटी लागू झाला. त्यानंतर ठेकेदाराची सद्दी संपली, परंतु महापालिकेचा त्रास वाढला. जकातीएवढे उत्पन्न मिळत नसल्याने पालिकेची अडचण झालीच; परंतु जकातीच्या नियमावलीत अनेक बदल करून त्यातील करपात्र मालाची तपासणी व अन्य कलमे वगळण्यात आल्याने पालिकेची अडचण निर्माण झाली. महापालिकेची जकात वसुली रद्द झाली, त्या अगोदरच्या वर्षात महिन्याला साठ कोटी रुपयांची वसुली होत होती. त्यानंतर पुढील आर्थिक वर्षात महिन्याकाठी ८० कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित असताना, प्रत्यक्षात मात्र ५५ ते ५८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. नुकत्याच सरलेल्या आर्थिक वर्षात जकातीपोटी साडेआठशे कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते; परंतु जकात रद्द झाल्यानंतर एलबीटीच्या माध्यमातून ६७० कोटी रुपयांचेच उत्पन्न मिळाले. त्यामुळे पालिकेचा खोळंबा झाला आहे. महापालिकेची दैनंदिन कामे, नेहरू अभियानातील कामे आणि कुंभमेळ्याची कामे सारीच खोळंबली आहेत. जकातीऐवजी एलबीटी लागू झाल्यानंतर महापालिकेला विक्रमी उत्पन्न मिळेल असे दावे उद्योजक आणि व्यापार्‍यांनी केले होते, ते सारेच फोल ठरले आहेत. त्यामुळे महपालिका खूश नाही आणि व्यापार्‍यांचा विरोध कायम आहे. उद्योजकही त्याला साथ देत असल्याने आता हा कर रद्द करण्याची आणि नवीन पर्याय शोधण्याची वेळ राज्य शासनावर आली आहे.