शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

टॉवर जप्तीप्रकरणी मनपाची कोंडी

By admin | Updated: March 23, 2017 01:06 IST

नाशिक : महापालिकेने मिळकत कराची थकबाकी असलेल्या मोबाइल कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर दोन मोबाइल कंपन्यांनी त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली.

नाशिक : महापालिकेने मिळकत कराची थकबाकी असलेल्या मोबाइल कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर दोन मोबाइल कंपन्यांनी त्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयात सुनावणी होऊन महापालिकेने त्वरित संबंधित मोबाइल टॉवरची वीजजोडणी सुरू करून द्यावी व सील ठोकू नये, असे आदेश न्यायालयाने दिले. त्यामुळे महापालिका कोंडीत सापडली असून, आता थकबाकी वसूल करण्यासाठी घरमालकांकडेच मोर्चा वळविण्याचा निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे.  महापालिकेने मिळकत कराची थकबाकी असलेल्या काही मोबाइल कंपन्यांच्या टॉवरविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार महापालिकेने जीटीएल, एटीसी, एअरसेल या कंपन्यांचे मिळून सुमारे २७ मोबाइल टॉवर जप्त करत सील ठोकण्याची कारवाई केली होती. परंतु, महापालिकेच्या या कारवाईविरोधात जीटीएल आणि एटीसी या मोबाइल कंपन्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालयाने संबंधित टॉवर्सचे सील ताबडतोब काढण्याचे आदेश देतानाच वीज मंडळाची जोडणी त्वरेने जोडण्याचेही आदेश दिले. महापालिका केवळ जप्तीची कारवाई करून मालमत्तेचा लिलाव करू शकते, असेही न्यायालयाने महापालिकेला फटकारले आहे. उच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर महापालिकेने संबंधित टॉवर्सची वीज जोडणी सुरू करण्याची कार्यवाही केली. मात्र, टॉवर्सच्या कारवाईला त्यामुळे ब्रेक बसणार आहे. टॉवर्स सील करायचे नाही तर मग जप्तीची कारवाई कशी करायची आणि वसुली कशी होणार, या पेचात महापालिका सापडली  आहे. (प्रतिनिधी)