शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली ठाकरे बंधूंची खिल्ली
2
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
3
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
4
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
5
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
6
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
7
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
8
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
9
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
10
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
11
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
12
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
13
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
14
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
15
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
16
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
17
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
18
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
19
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
20
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?

पाण्यासाठी नगरसूलवासीय रस्त्यावर

By admin | Updated: April 12, 2016 00:30 IST

रास्ता रोको : चारा छावण्या सुरू करण्याची मागणी

 येवला : नगरसूलकरांचा घसा कोरडा पडला असून, जनावरांना चारा नाही, पाणी टँकरची वारंवार मागणी करूनदेखील टँकर मिळत नाही या यामुळे संतप्त ग्रामस्थांनी येवला -नांदगाव रस्त्यावर सुमारे तासभर रास्ता रोको केला. यामुळे रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतूक खोळंबली. मंडळ अधिकारी अशोक पगारे, तलाठी पिंपळसे यांनी आंदोलन-कर्त्यांकडून निवेदन स्वीकारले. आंदोलनाचे नेतृत्व सरपंच प्रसाद पाटील, उपसरपंच नवनाथ बागल यांनी केले. या रास्ता रोकोत नगरसूल परिसरातील वाड्या-वस्त्यांवरील सुमारे ५०० ग्रामस्थ सहभागी झाले होते.सोमवारी सकाळी १० वाजता आंदोलनकर्ते नगरसूल फाट्यावर आले व रास्ता रोको सुरू केला. यावेळी सरपंच प्रसाद पाटील, उपसरपंच नवनाथ बागल यांनी भाषणाच्या सुरात येवला तहसील पाणीपुरवठा विभागातून नगरसूल येथील सात वाड्या व १४ वस्त्यांवर एकाच टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. परंतु हा टँकर एका वस्तीवर गेल्यानंतर तेथेच त्याचे पाणी संपत असल्याने दररोज एकाच वस्तीवर पाणीपुरवठा होत असून, इतर वाड्या-वस्त्या पाण्याअभावी तहानलेल्याच राहत आहेत. त्यामुळे या ठिकाणी स्वतंत्र टँकर सुरू करण्यात यावा. पाण्याची मागणी मान्य झाली नाही तर आपण वांरवार आंदोलन करून मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधणार असल्याचे सांगितले. गोविंद धनवटे, विलास बारे, मनोहर वानखेडे, संदीप कुडके, सीताराम पैठणकर, यशोदा पैठणकर आदिंनी ३८ गाव पाणीपुरवठा योजनेद्वारे ४ दिवसाआड पाणी द्यावे, चारा छावण्या सुरू करण्याची मागणी करण्यात आली. (वार्ताहर)