शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक इमारतींबाबत मनपा उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 00:50 IST

मालेगाव : राज्यात धोकादायक इमारती कोसळून निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे, असे असताना मालेगाव महापालिका धोकादायक इमारत मालकांवर कारवाई करण्याचे धारिष्ट्य दाखवित नसल्याचे समोर आले आहे. केवळ नोटीस बजावून महापालिका प्रशासन धन्यता मानत आहे.

ठळक मुद्देमालेगाव : खासगी मिळकतींचे स्ट्रक्चरल आॅडिट कोणी करायचे?

अतुल शेवाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : राज्यात धोकादायक इमारती कोसळून निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे, असे असताना मालेगाव महापालिका धोकादायक इमारत मालकांवर कारवाई करण्याचे धारिष्ट्य दाखवित नसल्याचे समोर आले आहे. केवळ नोटीस बजावून महापालिका प्रशासन धन्यता मानत आहे. खासगी धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करायचे कोणी, असा प्रश्न महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित करून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला आहे, तर शहरात आठ हजार ६५२ अनधिकृतरीत्या बांधकामे झाली आहेत. संबंधितानी बांधकाम परवानगी न घेता महापालिकेचा महसूल बुडविला आहे.शहरात १५ अतिधोकादायक, १४४ इमारती राहण्यायोग्य नाहीत तर ३३ इमारतींची दुरुस्ती करणे गरजेचे आहे. अशा १९२ इमारती महापालिकेच्या नगररचना विभागाने धोकेदायक ठरविल्या आहेत. 192इमारती धोकादायक असल्याची नोंद मनपाकडे आहे. मात्र स्ट्रक्चरल आॅडिटचा खर्च कुणी करायचा, या विषयावरून महापालिकेच्या नगररचना, बांधकाम विभागाच्या व प्रभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांमध्ये असमन्वय दिसून येत आहे.तज्ज्ञ काय म्हणतात?मुंबई व इतर शहरांमध्ये धोकादायक इमारती कोसळून दुर्घटना घडल्या आहेत. मालेगाव महापालिकेने मोडकळीस आलेल्या इमारतींवर नियमाप्रमाणे कारवाई करावी. धोकादायक इमारती निष्कासित कराव्यात. धोकादायक इमारती खाली करणे गरजेचे आहे.- कुंदन चव्हाण, अभियंतामहापालिकेची भूमिकामहापालिकेच्या चारही प्रभागांतील धोकादायक इमारत मालकांना नोटिसा बजावल्या आहेत. भविष्यात पोलिसांच्या मदतीने धोकादायक इमारती खाली करून घेण्यात येतील. तसेच इमारती पाडण्याची कारवाई केली जाणार आहे. नगररचना व बांधकाम विभागाला, प्रभाग अधिकाºयांना सूचना देण्यात आल्या आहेत.- किशोर बोर्डे, मनपा आयुक्तधोकादायक इमारती ठरतील जीवघेण्यासध्या शहर परिसरात पाऊस सुरू आहे. महापालिकेची धोकादायक इमारतींबाबत उदासीन भूमिका दिसून येत आहे. केवळ धोकादायक खासगी इमारतींचे प्रभागनिहाय सर्वेक्षण करून नोंद घेण्यात आली आहे व इमारत मालकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र ठोस कारवाई केली जात नाही दुर्दैवी घटना घडल्यानंतरच मनपाला जाग येईल का?