शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

मनपा रुग्णालयांना गळती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 00:47 IST

नाशिक : महापालिकेच्या चारही रुग्णालयांसह बव्हंशी शहरी आरोग्य केंद्राच्या इमारतींना गळती लागलेली आहे तर अनेक ठिकाणी दुरुस्तीची कामे झालेली नाहीत. वैद्यकीय विभागाने यासंबंधीचा अहवाल बांधकाम विभागाला सादर करून महिना उलटला तरी अद्याप कामांना गती मिळालेली नाही. त्यामुळे पालिकेची रुग्णालयेच सध्या असुविधांनी आजारी असल्याचे धक्कादायक चित्र आहे.

नाशिक : महापालिकेच्या चारही रुग्णालयांसह बव्हंशी शहरी आरोग्य केंद्राच्या इमारतींना गळती लागलेली आहे तर अनेक ठिकाणी दुरुस्तीची कामे झालेली नाहीत. वैद्यकीय विभागाने यासंबंधीचा अहवाल बांधकाम विभागाला सादर करून महिना उलटला तरी अद्याप कामांना गती मिळालेली नाही. त्यामुळे पालिकेची रुग्णालयेच सध्या असुविधांनी आजारी असल्याचे धक्कादायक चित्र आहे. महापालिकेच्या आरोग्य समितीची पहिली सभा नुकतीच झाली. त्यावेळी, सदस्यांनी पावसाळ्यात रुग्णालयांच्या इमारतींना गळती लागल्याच्या तक्रारी केल्या होत्या याशिवाय, ड्रेनेजसह पाणीपुरवठाविषयकही तक्रारी मांडल्या होत्या. दरम्यान, महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने रुग्णालयातील असुविधा व समस्यांविषयी महिनाभरापूर्वीच बांधकामसह विद्युत, पाणीपुरवठा व ड्रेनेज विभागाला अहवाल सादर केलेला असून, त्याबाबत संबंधित विभागांकडून मात्र अद्याप दखल घेतली गेली नसल्याचे दिसून येते. सर्वाधिक चर्चेत असलेल्या नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयातील सर्व खोल्यांतील पॅसेज, शस्त्रक्रियागृह याठिकाणी गळती आहे.पाण्याची टाकी दुरुस्तीची गरज असून, फ्लोरिंगही नव्याने बसविण्याची आवश्यकता आहे. याशिवाय लिफ्ट नादुरुस्त झालेली आहे. सोलर वॉटर हिटरही खराब झालेले आहे. पाणीपुरवठ्याच्या पाइपलाइनचे स्टॉप कॉक खराब आहेत. ड्रेनेज चोकअप झालेले आहेत. पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयातही भिंतींमध्ये लिकेजेस आहेत. लोखंडी खिडक्या जीर्ण झालेल्या आहेत. विद्युत फिटिंग जुनी झालेली आहे. विद्युत जनित्रांची आवश्यकतामहापालिकेच्या सातपूर, गंगापूर, एम.एच.बी.कॉलनी, उपनगर, भारतनगर, वडनेर दुमाला, गोरेवाडी, दसक पंचक, तपोवन, पंचवटी, सिडको, पिंपळगाव खांब या शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रात विद्युत जनित्राची नितांत आवश्यकता आहे. त्याबाबतचाही अहवाल वैद्यकीय विभागाने विद्युत विभागाला सादर केलेला आहे. याशिवाय, अनेक ठिकाणी पंखे नादुरुस्त झालेले आहेत. फिटिंग जुन्या झालेल्या आहेत. त्यातही दुरुस्तीची गरज असल्याचे अहवालात म्हटले आहे. मात्र, अद्याप अहवालानुसार कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. सिडकोतील मोरवाडी रुग्णालयातील पीएनसी वॉर्ड, जनरल वॉर्ड, लेबर रूम, शस्त्रक्रियागृह याठिकाणी गळती आहे. रुग्णालयातील इन्व्हर्टर नादुरुस्त आहे. कथडा येथील डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयही असुविधांच्या गर्तेत आहे. याठिकाणी सर्व खोल्यांमध्ये गळती आहे. लिफ्ट नादुरुस्त आहे. ड्रेनेजही चोकअप झालेले आहेत. महापालिकेच्या या चारही रुग्णालयांची अशी स्थिती असताना शहरी आरोग्य केंद्रांनाही विविध समस्यांनी घेरलेले आहे. पावसाळ्याचे दोन महिने शिल्लक आहे. मात्र, बांधकाम विभागाकडून अद्याप गळती थांबविण्यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.