शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पालिका निवडणुकीवर रक्तरंजित संघर्षाचे सावट

By admin | Updated: January 22, 2017 23:14 IST

भय इथले संपत नाही : अनेक राजकीय पक्षांकडे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे ‘इच्छुक’

नाशिक : यंदाची महापालिका निवडणूक प्रचंड दहशतीच्या सावटाखाली होण्याची दाट शक्यता जेलरोड येथील घटनेमुळे समोर आली आहे. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच निवडणुकीला रक्तरंजित गालबोट लागले असून, गेल्या काही वर्षांपासून फोफावलेल्या टोळ्यांमुळे गुंडगिरीचा मोठा संघर्ष पालिका निवडणुकीत होण्याची भीती निर्माण झाली आहे. एकूणच इच्छुक उमेदवार म्हणून समोर आलेले चेहरे आणि प्रभागातील प्रतिस्पर्धी मोडून काढण्यासाठी सुरू झालेले धमकीसत्र पाहता आगामी काळ निवडणुकीसाठी संघार्षाचा असेल याबाबत मतदारांमध्ये चिंतेचा सूर उमटत आहे.  गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात घडणाऱ्या राजकीय घटनांमुळे यंदाची निवडणूक चिंताजनक ठरण्याची शक्यता आहे. अनेक पक्षांकडून गुन्हेगारी प्रवृत्तीचे इच्छुक असून, त्यांना शब्दही देण्यात आल्याने उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी आपल्या ‘स्टाइलने’ निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे. काहींनी तर प्रतिस्पर्ध्याला धमकाविण्याचे प्रकार सुरू केले आहेत. खून, खंडणी, अपहरण, शासकीय कामात हस्तक्षेप, लूटमार आणि चिथावणी देण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आणि तुरुंगवारी करून आलेल्यांना उमेदवारीचा शब्द देण्यात आल्यामुळे यातील काही स्वत:साठी तर काही आपल्या कुटुंबातील सदस्यांसाठी मैदानात उतरलेले आहेत. विशेष म्हणजे अनेक पक्षांनी अशा इच्छुकांना जवळ केल्याने यंदाच्या निवडणुकीत प्रभागांमधील चित्र काय असू शकते, याचा अंदाज पोलिसांनी आताच घेतलेला बरा अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे.  जेलरोड येथे शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या इच्छुक उमेदवाराचा भर चौकात खून करण्यात आल्याच्या घटनेमुळे तर नाशिककरांनी आत्ताच धास्ती घेतली आहे. या घटनेनंतर प्रत्येक राजकीय पक्ष हा आपल्या पक्षात सारेच पावन उमेदवार असल्याचा आव आणतीलही, परंतु नाशिककरांना गुन्हगारी प्रवृत्तीच्या उमेदवारांविषयी चांगलीच माहिती असून, काही प्रभागात तर गुंडगिरीचा अनुभव नागरिकांना आतापासूनच येत आहे. वरवर पाहता इच्छुकांकडून प्रचार सुरू असल्याचे दिसत असले तरी प्रतिस्पर्धी इच्छुकांना धमकावण्याचे आणि त्यांना निवडणूक न लढण्यासाठी गुंडांकडून दमदाटी करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे प्रकरण कधी कुठवर जाईल याचीच भीती नागरिक आणि पोलीस प्रशासनालाही लागली आहे.  गुंडांमुळे राजकीय पक्षांचे वाढते प्राबल्य आणि गुन्हेगारांना मिळणारा राजकीय आश्रय यामुळे गुन्हेगार आणि राजकीय पक्ष यांच्यातील संबंध लपून राहिलेले नाहीत. गेल्या वर्ष-दोन वर्षांपासून शहरातील टोळीयुद्ध आणि खुनाच्या घटनांचा आलेख पाहता यंदाची निवडणूक कोणत्याही थराला जाण्याची शक्यता शक्यता आहे.