शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सटाण्यातील ‘ती’ पडकी इमारत पाडण्यासाठी पालिकेची चालढकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:10 IST

न्यायमूर्ती एस.डी. चव्हाण यांनी २८/८/२०१९ रोजी आदेश दिलेला असताना सटाणा नगरपालिका प्रशासनाने गेल्या तीन वर्षात कोणतीही कार्यवाही केलेली नाही. ...

न्यायमूर्ती एस.डी. चव्हाण यांनी २८/८/२०१९ रोजी आदेश दिलेला असताना सटाणा नगरपालिका प्रशासनाने गेल्या तीन वर्षात कोणतीही कार्यवाही केलेली नाही. या काळात ही इमारत अधिक धोकादायक झाली असून केव्हाही या इमारतीचा धोकादायक भाग कोसळण्याची दाट शक्यता आहे. यामुळे वित्त व प्राणहानी होण्याची भीती व्यक्त होते आहे.

यासंदर्भात कै. हेडे यांच्या वारसांनी नगरपालिका प्रशासनावर २७/०१/२०१५ रोजी सटाणा न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र पालिका प्रशासनाने यावर तीन वर्षात कोणतीही कार्यवाही न करता या वारसांना आपणच इमारतीचा जीर्ण भाग काढून टाकावा याबाबत नोटिसा पाठवून न्यायालयाचा अवमान केला आहे.

नगरपालिका प्रशासनाने मोडकळीस आलेल्या इमारतींचा भाग काढून टाकावा व त्यासाठीचा खर्च संबंधित घरमालकाकडून वसूल करावा, असे या न्यायालयीन आदेशात म्हटले आहे. हेडे कुटुंबीय हा खर्चही देण्यास तयार असताना पालिका प्रशासन याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याने हेडे कुटुंबाला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

नगरपालिकेमार्फत आपत्कालीन परिस्थितीसाठी कार्यवाही करण्यात उदासीन असून सन २०२०-२१ चा अर्थसंकल्पात आपत्कालीन व्यवस्थेसाठी १५ लाख रुपयांची तरतूद केली असून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने या रकमेचा उपयोग काय, असा प्रश्न विचारला जात आहे. पालिका प्रशासनाने हा मोडकळीस आलेल्या इमारती धोकादायक भाग काढण्याचा निर्णय गांभीर्याने न घेतल्यास कोणतीही अप्रिय घटना पावसाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर होऊ शकते. भर पावसाळ्यात जीवितहानीच्या धोक्याची टांगती तलवार शहरवासीयांवर कायम राहणार आहे.

फोटो कॅप्शन : ११ सटाणा बिल्डिंग

सटाणा येथील मल्हार रोडवरील जीर्ण झालेली धोकादायक इमारत.

110721\11nsk_9_11072021_13.jpg

सटाणा येथील मल्हार रोडवरील जीर्ण झालेली धोकादायक इमारत