शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

्नरमाई आवासचा दोन कोटी रुपयांचा निधी पडून पालिका संथ : लाभपात्र व्यक्ती वंचित

By admin | Updated: May 20, 2014 00:45 IST

नाशिक : राज्य शासनाच्या वतीने सध्या दूरचित्रवाहिन्यांवर रमाई आवास योजनेचा गाजावाजा सुरू असला, तरी नाशिक शहरात गेल्या दोन ते तीन वर्षांत कोणालाही घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही. समाजकल्याण खात्याने दोन कोटी रुपये महापालिकेकडे वर्ग केले असून, तरीही पालिका लाभ देत नसल्याने झोपडप˜ीवासीय वंचित राहत आहेत.

नाशिक : राज्य शासनाच्या वतीने सध्या दूरचित्रवाहिन्यांवर रमाई आवास योजनेचा गाजावाजा सुरू असला, तरी नाशिक शहरात गेल्या दोन ते तीन वर्षांत कोणालाही घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही. समाजकल्याण खात्याने दोन कोटी रुपये महापालिकेकडे वर्ग केले असून, तरीही पालिका लाभ देत नसल्याने झोपडप˜ीवासीय वंचित राहत आहेत.झोपडप˜ीवासीयांना हक्काचे घर मिळावे यासाठी राज्य शासनाने रमाई आवास योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत झोपडप˜ीतील अनुसूचित जातीच्या व्यक्तीला आपल्या राहत्या घराच्या जागेवरच बांधकाम करता यावे यासाठी दोन लाख रुपये दिले जातात. अर्थात, त्यातील दहा टक्के रक्कम लाभपात्र व्यक्तीला जमा करावी लागते. या योजनेची समाजकल्याण खात्याकडे जबाबदारी असली, तरी शहरी भागात महापालिका नोडल एजन्सी आहेत. या योजनेसाठी महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीत शासनाच्या नगररचना विभाग आणि अन्य खात्यांचे प्रतिनिधी असून, समाजकल्याण विभागाचे विभागीय संचालक हे सदस्य सचिव आहेत. सदरची योजना अमलात आल्यानंतर आत्तापर्यंत अडीचशे व्यक्तींनी महापालिकेकडे प्रस्ताव सादर केले आहेत; परंतु पालिकेकडून संथगतीने कार्यवाही होत असल्याने समाजकल्याण विभागाकडून लाभार्थींना देण्यासाठी आलेला दोन कोटी रुपयांचा निधी अक्षरश: पडून आहे. आत्तापर्यंत २२ प्रकरणे मंजूर झाली आहेत. त्यासाठी निधी उपलब्ध आहे; परंतु लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेच्या कचाट्यात हे प्रस्ताव अडकल्याने अद्याप त्यावर निर्णय घेतलेला नाही. लवकरच या व्यक्तींना निधी वितरित केला जाणार आहे.पन्नास लाभार्थींना मिळणार निधीरमाई आवास योजनेअंतर्गत महापालिकेने आधी २२ प्रकरणे मंजूर केली; परंतु आचारसंहिता लागू असल्याने लाभपात्र व्यक्तींना निधी वितरित करता आलेला नाही. त्यानंतर आणखी २१ प्रकरणे मंजूर असून, आता लवकरच या निधीचे वितरण करण्याचा निर्णय आयुक्त घेतील.- यशवंत ओगले, झोपडप˜ी निर्मूलन अधिकारी