शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

‘त्या’ मिळकती मनपा ताब्यात घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 00:53 IST

महापालिकेच्या मिळकती भाड्याने घेतल्यानंतर कराराची मुदत संपल्यानंतरही जी समाजमंदिरे, व्यायामशाळा किंवा क्रीडा संकुले अन्य खासगी संस्थांच्या ताब्यात आहेत त्या सर्व मिळकती तातडीने ताब्यात घेण्याचे आदेश गुरुवारी (दि.१३) स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आले. याशिवाय ज्या मिळकतींचे भाडे थकवूनही त्यांचा वापर सुरू आहे, त्यांच्याकडूनदेखील सर्व प्रकारची थकबाकी त्वरित वसूल करण्याचे आदेश सभापती उद्धव निमसे यांनी दिले आहेत.

ठळक मुद्देस्थायीचा निर्णय : संस्था, मंडळांकडून थकीत भाडेही वसूल करणार

नाशिक : महापालिकेच्या मिळकती भाड्याने घेतल्यानंतर कराराची मुदत संपल्यानंतरही जी समाजमंदिरे, व्यायामशाळा किंवा क्रीडा संकुले अन्य खासगी संस्थांच्या ताब्यात आहेत त्या सर्व मिळकती तातडीने ताब्यात घेण्याचे आदेश गुरुवारी (दि.१३) स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आले. याशिवाय ज्या मिळकतींचे भाडे थकवूनही त्यांचा वापर सुरू आहे, त्यांच्याकडूनदेखील सर्व प्रकारची थकबाकी त्वरित वसूल करण्याचे आदेश सभापती उद्धव निमसे यांनी दिले आहेत.स्थायी समितीची साप्ताहिक बैठक गुरुवारी (दि.१३) पार पडली. यावेळी गंगापूररोड येथे शिवसत्य मंडळाच्या ताब्यात असलेल्या महापालिकेच्या क्रीडा संकुलाबाबत दोन वर्षांपासून कोणत्याही प्रकारचा करार झालेला नाही. तरीही सदरच्या संस्थेच्या ताब्यात असलेल्या जागेसाठी दोन कोटी ८६ लाख रुपये खर्च करून बॅॅडमिंटन हॉलचे नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव असल्याने त्यावर चर्चा झाली. करार संपून दोन वर्षे झाले तरी प्रशासनाने ही मिळकत ताब्यात घेतलेली नाही आणि दुसरीकडे मात्र समाजमंदिरे विशेषत: ज्येष्ठ नागरिकांच्या ताब्यातील मिळकती तातडीने ताब्यात घेऊन सील करण्यात आल्या, अशी तक्रार नगरसेविका स्वाती भामरे यांनी केली. त्याचप्रमाणे सौभाग्य नगरात समाजमंदिराच्या वरील मजल्यावर बेकायदेशीररीत्या जीम सुरू असून, व्यावसायिक वापर सुरू आहे. महापालिकेशी कोणताही करार न करता व्यावसायिक पद्धतीने वापर सुरू आहे. शिवाय संबंधित संस्थेने न्यायालयात धाव घेतली आहे. अशाप्रकारे कोणतीही संस्था परस्पर महापालिकेच्या भूखंडावर कसा काय दावा सांगू शकते? असा प्रश्न त्यांनी केला. महापालिकेच्या पथदीपांवरून चोरून वीज जोडणी घेऊनही महापालिकेचा विद्युत विभाग वीजचोरीचा गुन्हा का दाखल करीत नाहीत? असा प्रश्न त्यांनी केला, तर गोविंदनगर येथील मिळकत दहा वर्षांपासून जिजाऊ संस्थेच्या ताब्यात मोफत आहे. आता त्यावर कारवाईचे आदेश निघाल्यानंतर सिडकोच्या विभागीय अधिकाऱ्यांनी तातडीने चार महिन्यांचे आगाऊ भाडे आयुक्तांच्या परवानगीशिवाय भरून घेतले, असे कल्पना पांडे यांनी निदर्शनास आणल्याने मिळकतींबाबत महापालिकेच्या कारवाईचा गोंधळ सुरू असल्याचे स्पष्ट झाले.मिळकत विभागाचे प्रमुख महेश तिवारी यांनी शिवसत्य मंडळाकडून मिळकत ताब्यात घेण्याचे आदेश विभागीय अधिकाऱ्यांना देण्यात आले असून, दोन दिवसांत कार्यवाही करण्यात येईल असे स्पष्ट केले तर गोविंदनगर येथील मिळकतीबाबत सिडकोतील एका कारकुनाने परस्पर संस्थेकडून रेडीरेकनरनुसार पैसे भरून घेतल्याने विभागीय अधिकारी वाडेकर यांना त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी आयुक्तांनी नोटीस बजावल्याचे सांगितले. यावेळी महापालिकेच्या कारवाईतील दुजाभाव आणि विशिष्ट संस्थांना ताब्यात घेणाºयांवर प्रशासन मेहेरबानी करीत असल्याच्या आरोपानंतर स्थायी समिती सभापती उद्धव निमसे यांनी शिवसत्य मंडळासह ज्या संस्थांचे करार संपले असतील त्यांच्या मिळकती तातडीने ताब्यात घेण्याचे आदेश दिले. भाडे न भरताच मिळकतींचा वापर करणाºयांना संस्थांकडूनदेखील भाडे वसूल करण्याचे आदेश सभापतींनी दिले.

शिवसत्य मंडळाला १९८७ साली गंगापूररोडवरील जागा कराराने ताब्यात देण्यात आली. त्यांना अवघे ११ रुपये भाडे आकारले जात असल्याची माहिती मिळकत अधिकारी महेश तिवारी यांनी दिली, तर सौभाग्यनगरातील समाजमंदिरात जीम सुरू करून नागरिकांकडून भाडे वसूल करणे तसेच भल्या पहाटे गाणे लावून व्यायाम करण्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त असून, त्यामुळे संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी स्वाती भामरे यांनी केली.

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिका