शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
2
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
3
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
5
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी, प्रस्ताव मिळताच मदतनिधी देणार; PM नरेंद्र मोदींचं आश्वासन
6
चैतन्यनंदचे काळे कारनामे! मुलींची निवड करुन त्यांना कसं बनवायचा गुलाम?, खळबळजनक खुलासा
7
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय
8
आजचे राशीभविष्य, २७ सप्टेंबर २०२५: जमीन, घर अथवा वाहन खरेदीसाठी आजचा दिवस अनुकूल नाही
9
ठाण्यात भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष; एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेत बैठकीला गणेश नाईकांचा ‘बहिष्कार’
10
आधी नगरपालिका की जिल्हा परिषद?;निवडणूक आयोगाची दोन्हींसाठी तयारी सुरू
11
कुजबुज! ओल्या दुष्काळात काजू-बदामची चर्चा; शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी अन् राजकीय चिखलफेक
12
१६५ तोळे सोने, दोन किलो चांदी अन् ११ लाख राेख देऊनही छळ; मायानगरी मुंबईत विवाहितेचा गर्भपात
13
मढ बेट बनावट नकाशा प्रकरणाची गहाळ फाइल शोधा, अन्यथा गुन्हा दाखल करा; हायकोर्टाचे निर्देश
14
पीएनबी घोटाळा: सीबीआय न्यायालयात अर्जास मान्यता; नीरव मोदीचा मेव्हणा ‘माफीचा साक्षीदार’
15
आता पहिलीपासूनच शिका शेती; शालेय अभ्यासक्रमात टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश
16
दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवर रविवारी होणार ‘प्रवासखोळंबा’
17
तीन कोटी खर्चून ‘उपचार’, तरीही आईची प्रकृती सुधारेना; मुलाची पोलीस स्टेशनला तक्रार, तपास सुरू
18
चिंताजनक ‘लडाख फाइल्स’! सोनम वांगचुक यांना देशद्रोही ठरवून तुरुंगात सडविणे दिसते तितके सोपे नाही
19
ट्रम्प, जिमी किमेल आणि गुदगुल्यांचा ‘खंजीर’! ही एकी जगभरातील माध्यमांसाठी एक संदेशच...

महापालिका : उत्पन्नवाढीसाठी सुचविल्या विविध उपाययोजना

By admin | Updated: May 17, 2017 00:38 IST

‘स्थायी’च्या अंदाजपत्रकात३८९ कोटींची वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : महापालिका आयुक्तांनी सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी सादर केलेल्या १४१०.०७ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकात स्थायी समितीने ३८९ कोटी रुपयांची भर घातली असून विविध प्रकल्प बीओटीवर राबविण्याचा संकल्प सोडतानाच उत्पन्नवाढीसाठी विविध उपाययोजनाही सुचविल्या आहेत. पुढील आठवड्यात महापालिकेच्या विशेष अंदाजपत्रकीय सभेत स्थायी समितीचे अंदाजपत्रक सादर होण्याची शक्यता आहे. नाशिक महानगरपालिकेची खालावलेली आर्थिक स्थिती लक्षात घेता कोणत्याही नव्या संकल्पना अथवा प्रकल्पांची मांडणी करण्याचे धाडस न दाखवता अस्तित्वातीलच मालमत्ता व प्रकल्पांच्या देखभाल-दुरुस्तीवर भर देण्याचे ठरवत सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी १४१०.०७ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक आयुक्तांनी १७ एप्रिल रोजी स्थायी समितीला सादर केले होते. स्थायी समितीने आयुक्तांच्या अंदाजपत्रकात ३८९ कोटी रुपयांची भर घातली आहे. त्यामुळे महापालिकेचे अंदाजपत्रक १७९९ कोटी रुपयांवर जाऊन पोहोचले असून, त्यात महासभा आणखी किती भर घालते, याकडे आता लक्ष लागून राहणार आहे. महापालिका आयुक्तांनी अंदाजपत्रकात उत्पन्नवाढीसाठी मिळकत करात सुमारे १४ टक्के तर पाणीपुरवठा करामध्ये ५ टक्के दरवाढ प्रस्तावित केली होती. परंतु, स्थायी समितीने घरगुती मिळकत करातील वाढ फेटाळून लावतानाच व्यावसायिक मिळकत व पाणीपुरवठा दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नगरसेवक निधी ४० लाख रुपयेमहापालिकेची आर्थिक स्थिती लक्षात घेता यंदा भांडवली कामांसाठी १३०.५८ कोटी रुपयेच उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे यंदा नगरसेवक निधीसाठी अंदाजपत्रकात किती रकमेची तरतूद केली जाते, याकडे लक्ष लागून होते. स्थायी समितीने ४० लाख रुपये नगरसेवक निधी प्रस्तावित केला आहे. त्यामुळे एका प्रभागाला चार नगरसेवक मिळून १ कोटी ६० लाख रुपयांचा निधी प्राप्त होऊ शकतो. नगरसेवकांमध्ये आपापसात समन्वय राहिल्यास एखादा मोठा प्रकल्पही त्या त्या प्रभागात उभा राहू शकतो. दरम्यान, स्थायी समितीने अंदाजपत्रकात विविध प्रकल्पांची भर घालतानाच उत्पन्नवाढीसाठीही विविध उपाययोजना सुचविल्या आहेत. त्यात महापालिका हद्दीतील सर्व्हिसरोडच्या माध्यमातून शासनाकडून अनुदान अपेक्षित धरण्यात आले आहे. तसेच मनपा क्षेत्रातील विविध खुल्या जागा विकसित करून त्याद्वारे उत्पनवाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. महापालिकेच्या शाळा इमारतींना भाड्यापोटी शासनाकडून अनुदान अपेक्षित धरण्यात आले आहे. व्यावसायिक तसेच घरगुती मिळकतींवरील वाढीव दरानुसार मलनिस्सारण करात उत्पन्न अपेक्षित असून, व्यावसायिक तसेच घरगुती मिळकतींमधील अनधिकृत नळजोडण्या ठराविक दंड आकारून नियमित करण्यावर भर दिला जाणार आहे. नवीन मीटरद्वारेही उत्पन्न अपेक्षित धरले आहे. शहरात जाहिरात फलकांच्या माध्यमातून उत्पन्नवाढीवर भर दिला जाणार आहे.