शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

गोदा प्रदूषणावरून मनपाला धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:46 IST

रामदास कदम : खर्चाबाबत दोन दिवसांत मागविला अहवाल

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिकरोड : गोदावरी नदी प्रदूषण मुक्तीसाठी महापालिकेने कोणत्या उपाययोजना केल्या याबाबतचा अहवाल दोन दिवसांत सादर करावा त्यानंतरच निधीची मागणी करावी, असे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी पालिका पदाधिकाऱ्यांना सुनावले. पर्यावरणाला हानीकारक ठरणाऱ्या प्लॅॅस्टिक पिशव्या बनविणाऱ्या कारखानदारांवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा पालिका आयुक्तांवर गुन्हा दाखल करावा लागेल, असा स्पष्ट इशाराच मंत्रिमहोदयांनी दिला. गोदावरी नदी प्रदूषणाबाबत गरुवारी दुपारी विभागीय आयुक्त कार्यालयात पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी त्यांनी शहरातील घनकचरा व सांडपाणी याबरोबरच गोदावरी प्रदूषण मुक्तीबाबतच्या उपाययोजना याचा पालिका अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. मनपाच्या अंदाजपत्रकात गेल्यावर्षी व यंदा असे मिळून १०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या १०० कोटीत पालिकेने पर्यावरण रक्षणासाठी कोणती कामे केली याचा हिशोब शासनाला द्यावा, त्यानंतरच शासनाकडे निधीची मागणी करावी, असे सुनावले. बैठकीमध्ये मनपा अधिकाऱ्यांनी शहरात २८५ एमएलडी सांडपाणी निर्माण होते. त्यातील २७५ एमएलडी पाणी मलनिस्सारण केंद्रात येते, तर दहा एमएलडी पाणी सेफ्टी टॅँकमध्ये जमा होत असल्याचे सांगितले. अन्यथा स्थगिती दिली जाईलगोदावरीचा उगम असलेल्या त्र्यंबकेश्वरमध्ये डोंगर फोडून नदी पात्रात भराव घालण्याचा व २५० एकर जमीन येलो करण्याचा घाट घातला जात असल्याबाबत कदम यांना पत्रकारांनी विचारणा केली असता याबाबत कदम यांनी जिल्हाधिकारी स्थगिती देतील, नाहीतर आपण स्थगिती देऊ असे स्पष्ट केले. राज्यात २७ महानगरपालिका असून, त्यांची सांडपाणी, घनकचरा यांचे नियोजन करण्यासाठी, नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी त्यांनी निर्धारित निधी खर्च केलाच पाहिजे. याकरिता प्रत्येक महानगरपालिकेला भेट देऊन माहिती घेत असल्याचे कदम यांनी यावेळी सांगितले.