शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका : आतापर्यंत ३०६२ दावे निकाली, नगररचना विभागाचे सर्वाधिक दावे ३०४८ दावे न्यायप्रविष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:57 IST

दिवाणीपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत महापालिकेने दाखल केलेले आणि महापालिकेविरुद्ध दाखल असलेले ३०४८ दावे न्यायप्रविष्ट असून, आतापर्यंत ३०६२ दावे निकाली निघाले आहेत.

ठळक मुद्देवकिलांच्या पॅनलची मासिक बैठकदाव्यांचा अंतिम निकाल३०४८ दावे हे न्यायप्रविष्ट

नाशिक : दिवाणीपासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत महापालिकेने दाखल केलेले आणि महापालिकेविरुद्ध दाखल असलेले ३०४८ दावे न्यायप्रविष्ट असून, आतापर्यंत ३०६२ दावे निकाली निघाले आहेत. सर्वाधिक १७७७ दावे हे नगररचना विभागाशी निगडीत दाखल झालेले आहेत. त्याखालोखाल मिळकतींशी संबंधित दाव्यांची संख्या ७५८ आहे. दरम्यान, महापालिकेच्या बाजूने निकालांची संख्या वाढावी यासाठी विधी समितीने आता वकिलांच्या पॅनलची मासिक बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे.महापालिकेच्या विधी समितीची बैठक सभापती शीतल माळोदे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी, नाशिक महापालिकेतील नगररचना विभागाशी संबंधित न्यायालयात दाखल झालेल्या दाव्यांची माहिती माळोदे यांनी विचारली होती. त्यानुसार, विधी विभागप्रमुख बी. यू. मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत महापालिकेशी संबंधित ६२२५ दावे विविध न्यायालयांमध्ये दाखल झालेले असून, त्यातील ३०६२ दाव्यांचा अंतिम निकाल लागलेला आहे, तर ३०४८ दावे हे न्यायप्रविष्ट आहेत. त्यात, प्रामुख्याने जकातीसंबंधी १०१, मिळकत कर-२७१, पाणीपुरवठा विभाग-४९, इलेक्ट्रिकल-१८, सार्वजनिक बांधकाम विभाग-१८०, सार्वजनिक आरोग्य-३४, वैद्यकीय-३४, अतिक्रमण-२४६, शिक्षण विभाग-२७, झोपडपट्टी-२१, पूर्व विभागीय कार्यालय-४३, सिडको विभागीय कार्यालय-१५, विविध कर विभाग-७९, मिळकत विभाग-४२५, तर निवडणूक विषयक ५७ दावे न्यायप्रविष्ट आहेत. आतापर्यंत नगररचना विभागाशी संबंधित सर्वाधिक १७७७ दावे दाखल झालेले आहेत. त्यापैकी ८५३ दाव्यांचा अंतिम निकाल लागला असून, ८८६ दावे प्रलंबित आहेत. महापालिकेविरुद्ध प्रामुख्याने, गंगापूररोडवरील वृक्षतोड, एलइडी खरेदी, पेलिकन पार्क, गोदावरी नदी प्रदूषण, पावसाळी गटार योजना आदी प्रकरणे मोठ्या प्रमाणावर गाजलेली आहेत. महापालिकेच्या बाजूने लागणाºया निकालांची संख्या कमी असल्याची ओरड नेहमीच महासभा-स्थायी समितीत सदस्यांकडून केली जात असते. शिवाय, महापालिकेने पॅनलवर नेमलेल्या वकिलांच्या बाबतही संशय व्यक्त केला जात असतो. वकीलवर्ग विरुद्ध पार्टीशी संगनमत करत असल्याचाही वारंवार आरोप झालेला आहे. त्या पार्श्वभूमीवर विधी समितीने आता अ‍ॅडव्होकेट पॅनलवरील वकिलांची मासिक सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे.