शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सातपूर मंडई परिसरातील अतिक्रमण हटविले महापालिकेची कारवाई : मेनरोडने घेतला मोकळा श्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 01:33 IST

नाशिक : महानगरपालिकेने पोलीस बंदोबस्तात धडक मोहीम राबवून सातपूर गावातील मंडईबाहेरील अनधिकृत विक्रेत्यांना हटविण्याबरोबरच मंडईतील व्यापाºयांचे पत्र्याचे शेड काढण्याची कारवाई पूर्ण केली.

ठळक मुद्देरस्ता मोकळा करण्याची ग्रामस्थांची मागणीसामोपचाराने वाद मिटविण्याचा प्रयत्न

नाशिक : महानगरपालिकेने पोलीस बंदोबस्तात धडक मोहीम राबवून सातपूर गावातील मंडईबाहेरील अनधिकृत विक्रेत्यांना हटविण्याबरोबरच मंडईतील व्यापाºयांचे पत्र्याचे शेड काढण्याची कारवाई पूर्ण केली. गेल्या अनेक दिवसांपासूनची ग्रामस्थांची मागणी पूर्ण झाल्याने मेनरोड मोकळा झाला आहे. मोहिमेप्रसंगी विक्रेत्यांनी प्रखर विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांच्या फौजफाट्यापुढे त्यांची मात्रा चालली नाही. सातपूर गावातील श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडई बाहेरील अनधिकृत विक्रेत्यांना हटवून रस्ता मोकळा करण्याची ग्रामस्थांची खूप दिवसांपासूनची मागणी होती तर मंडई बाहेरील विक्रे त्यांनी मंडईत स्थलांतरित व्हावे यासाठी मनपा प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत होते. मंडईच्या आतील आणि बाहेरील विक्रेत्यांमध्येही वाद होते. विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांनी भाजी विक्रेत्यांची बैठक घेऊन सामोपचाराने वाद मिटविण्याचा प्रयत्न केला होता. पोलीस बळाचा वापर करण्यात येईल, असाही इशारा देण्यात आला होता. मात्र कोणीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अखेर पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला. त्यानुसार, गुरुवारी (दि.२१) सकाळी १० वाजता प्रत्यक्ष मोहिमेला सुरूवात करण्यात आली. कमानीपासून रस्त्याच्या दुतर्फा असलेले अनधिकृत टपºयांचे अतिक्र मण हटविण्यात आले. त्यापाठोपाठ मंडई बाहेरील भाजीपाला, फळे, कटलरी, मसाला विक्रेत्यांना हटविण्यात आले. यावेळी हॉकर्स युनियनच्या माध्यमातून विक्रेत्यांनी प्रखर विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी सौम्य लाठीमार करून बघ्यांना पिटाळून लावले. याचवेळी मंडईतील व्यापाºयांनी दुकानाबाहेर उभारलेले पत्र्याचे शेड हटविण्यास सुरु वात केली. मंडईतील विक्रेत्यांचे अनधिकृत अतिक्रमणदेखील हटविण्यात आले. त्यानंतर मोहीम त्र्यंबकेश्वर रस्त्यावर आली आणि मशिदीलगतच्या अनधिकृत विक्रेत्यांना हटविण्याची कारवाई करण्यात आली.विक्रेत्यांकडून घोषणाबाजीमंडई बाहेरील अनधिकृत विक्रे त्यांना हटविण्याची कारवाई होत असताना ‘आम्हाला अगोदर जागा देऊन आमचे पुनर्वसन करावे, अशी जोरदार मागणी विक्रे त्यांनी विभागीय अधिकाºयांकडे केली. यावेळी विक्रे त्यांनी प्रखर विरोध करण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. हॉकर्स युनियनच्या पुष्पा वानखेडे यांनी हॉकर्सचे नेते शांताराम चव्हाण यांना घटनेची माहिती दिली. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. मंडई बाहेरील अनधिकृत विक्रे त्यांना हटविण्यात आल्यानंतर रस्ता पूर्णपणे मोकळा झाला. विक्रे त्यांच्या विळख्यात असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यानेदेखील मोकळा श्वास घेतला.