शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका : ‘एसआरए’ योजनेसाठी शासनाला प्रस्ताव प्रधानमंत्री आवास योजनेचे ५५,८४३ लाभार्थी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 00:50 IST

नाशिक : महापालिकेमार्फत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेतील चारही घटकांसाठी ५५ हजार ८४३ लाभार्थी निश्चित करण्यात आले असून, डीपीआर करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

ठळक मुद्देप्रकल्प राबविण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनाडीपीआर तयार करण्याचे काम सुरू

नाशिक : महापालिकेमार्फत केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेतील चारही घटकांसाठी ५५ हजार ८४३ लाभार्थी निश्चित करण्यात आले असून, डीपीआर करण्याचे काम सुरू असल्याची माहिती आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. दरम्यान, परवडणाºया घरकुलांच्या निर्मितीसाठी शासनाकडे एसआरए योजना राबविण्यास मंजुरी मिळण्याबाबत पत्र पाठविण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.पंतप्रधान मोदी यांनी सर्वांसाठी घरे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना लागू केली असून, त्याअंतर्गत चार घटकांमध्ये लाभार्थी निश्चित करण्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. महापालिकेने त्यासाठी झोपडपट्ट्यांचा सर्व्हेही पूर्ण केला आहे, तर अन्य घटकांतून लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. या प्राप्त अर्जांची छाननी होऊन आता चारही घटक मिळून ५५ हजार ८४३ लाभार्थी निश्चित करण्यात आले आहे. या लाभार्थ्यांना घरकुलांचा लाभ मिळावा याकरिता डीपीआर तयार करण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, झोपडपट्टी पुनर्वसनासाठी एसआरए धोरण राबविण्यास मंजुरी मिळण्याकरिता शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. सदर धोरण राबविण्यास मंजुरी मिळाल्यास पुष्कळ लाभार्थी या योजनेत समाविष्ट करणे शक्य होणार आहे. याशिवाय, परवडणारी घरे बांधण्यासाठी महापालिका व खासगी बांधकाम व्यावसायिक यांच्या भागीदारीने घरकुल योजना साकारण्याकरिता देकार मागविण्यात येणार असल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.वार्षिक कृती आराखडासद्यस्थितीत सन २००० पर्यंत स्लम घोषित झालेल्या झोपडपट्ट्यांमध्ये ही योजना लागू करण्यात आलेली आहे. परंतु, राज्य मंत्रिमंडळाने यापुढे सन २०११ पर्यंतच्या झोपडपट्ट्यांना संरक्षण देण्याचे घोषित केल्याने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. राज्य शासनाने अद्याप त्याबाबत अधिसूचना काढलेली नसल्याने सध्या आहे त्याच प्रकल्पांवर काम केले जाणार आहे. त्यासाठी वार्षिक कृती आराखडा तयार करण्यात येत असून, सरकारची अधिसूचना प्राप्त झाल्यानंतर नवीन लाभार्थ्यांनाही या आराखड्यात समाविष्ट करता येईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.