शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेकडे थकले पाणीपट्टीचे ५८ कोटी

By admin | Updated: May 7, 2017 00:32 IST

नाशिक : गंगापूर धरणातून उचललेल्या पाण्याच्या मोबदल्यात थकलेल्या ५८ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी पाटबंधारे खाते पाणी खंडित करण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : नाशिक शहरवासीयांसाठी गंगापूर धरणातून महापालिका पाण्याची उचल करीत असली तरी, उचललेल्या पाण्याच्या मोबदल्यात होणारी पाणीपट्टी पाटबंधारे खात्याकडे भरण्यास गेल्या तीन ते चार महिन्यांपासून चालढकल करीत असल्यामुळे थकलेल्या ५८ कोटी रुपयांच्या वसुलीसाठी पाटबंधारे खाते नाशिक महापालिकेचे पाणी खंडित करण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष करून महापालिका क्षेत्रात सुमारे ३० टक्के पाण्याचा वापर व्यावसायिक कारणांसाठी होत असताना महापालिका मात्र पाटबंधारे खात्याला घरगुती वापरासाठी आकारण्यात येणाऱ्या पाण्याचे देयक अदा करीत असून, नेमका त्यालाच पाटबंधारे खात्याने आक्षेप घेतला आहे. पाटबंधारे खात्याने महापालिका वेळोवेळी पत्रव्यवहार करून महापालिका हद्दीसाठी गंगापूर धरणातून उचलल्या जाणाऱ्या एकूण पाण्याच्या पाच टक्के पाणी हे व्यावसायिक कारणासाठी वापरले जात असल्याने व्यावसायिक वापरासाठी असलेल्या पाण्याच्या दराने पैसे भरण्याच्या सूचना केल्या आहेत. तथापि, महापालिका फक्त अडीच टक्के पाण्याचा वापर व्यावसायिक होत असल्याचा दावा करीत आहे, मात्र व्यावसायिक दराने त्याचे पैसे भरण्यास खळखळ करीत असल्याने पाटबंधारे खात्याचे महापालिकेकडे ५८ कोटींच्या आसपास घेणे शिल्लक आहे. महापालिका दरवर्षी आठ ते नऊ कोटी रुपये घरगुती वापराच्या दराने पैसे अदा करीत आहे, परंतु व्यावसायिक वापराचे पैसे भरत नसल्याचे पाटबंधारे खात्याचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे नाशिककरांकडून महापालिका घरगुती व व्यावसायिक अशी दोन्ही पाणीपट्टी वसूल करीत असल्याची बाब पाटबंधारे खात्याला अधिक खटकत आहे.