शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका : स्वतंत्र महासभा घेण्याचा निर्णयहॉकर्स झोनला सदस्यांचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 00:52 IST

नाशिक : महापालिकेच्या बुधवारी (दि. ३) झालेल्या महासभेत प्रस्तावित हॉकर्स झोनला सदस्यांनी तीव्र आक्षेप घेत त्यात सुधारणा करण्याची मागणी केली. दरम्यान, हॉकर्स झोनसाठी स्वतंत्र महासभा बोलावण्याचा निर्णय महापौर रंजना भानसी यांनी जाहीर केला. महापालिका क्षेत्रात फेरीवाल्यांचे नियंत्रण व नियमन करण्यासाठी उपविधीचा मसुदा मंजूर करण्याचा प्रस्ताव महासभेत ठेवण्यात आला होता. परंतु, त्याला सदस्यांनी आक्षेप घेतला.

ठळक मुद्देहॉकर्स झोन निश्चित करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात आलेले नाही आराखड्यात सुधारणा करण्याची गरज

नाशिक : महापालिकेच्या बुधवारी (दि. ३) झालेल्या महासभेत प्रस्तावित हॉकर्स झोनला सदस्यांनी तीव्र आक्षेप घेत त्यात सुधारणा करण्याची मागणी केली. दरम्यान, हॉकर्स झोनसाठी स्वतंत्र महासभा बोलावण्याचा निर्णय महापौर रंजना भानसी यांनी जाहीर केला.महापालिका क्षेत्रात फेरीवाल्यांचे नियंत्रण व नियमन करण्यासाठी उपविधीचा मसुदा मंजूर करण्याचा प्रस्ताव महासभेत ठेवण्यात आला होता. परंतु, त्याला सदस्यांनी आक्षेप घेतला. गुरुमित बग्गा यांनी सांगितले, हॉकर्स झोन निश्चित करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्यात आलेले नाही. ज्याठिकाणी गरज नाही तेथे हॉकर्स झोन पाडण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. सदर आराखड्यात सुधारणा करण्याची गरज असून, त्यासाठी विशेष महासभा बोलावण्याची सूचनाही बग्गा यांनी केली. तोपर्यंत सदर उपविधी मसुद्यास मंजुरी देऊ नये, अशी भूमिका घेण्यात आली. मात्र, प्रशासन उपआयुक्त हरिभाऊ फडोळ यांनी सदर मसुदा आणि हॉकर्स झोनचा आराखडा यांचा काही संबंध नसून ती नियमावली असल्याने त्यास मंजुरी देण्यास काहीच हरकत नसल्याचे सांगितले. सभागृहनेता दिनकर पाटील यांनीही याबाबत स्वतंत्र महासभा बोलावण्याची सूचना केली. त्यानुसार, महापौरांनी हॉकर्स झोनमध्ये सुधारणा करण्यासाठी महासभा घेण्याचे जाहीर केले. दरम्यान, महासभेत वैद्यकीय विभागाने ठेवलेल्या मानधनावर व आउटसोर्सिंगद्वारे भरतीच्या प्रस्तावालाही विरोधकांनी विरोध दर्शविला. डॉक्टरांची मानधनावर भरती करण्याबाबतचे रोस्टरच सदस्यांना देण्यात आले नसल्याने सदरचा प्रस्ताव पुन्हा पुढच्या महासभेत सादर करण्याची सूचना डॉ. हेमलता पाटील यांनी केली. मानधनावर दोन बायोमेडिकल इंजिनिअरची पदे भरती करण्याबाबतही विरोधकांनी आक्षेप घेतला. गुरुमित बग्गा यांनी सदरची भरती करण्याऐवजी मेंटेनन्सचे कंत्राट काढण्याची सूचना केली. अखेर महापौरांनी सदरचा प्रस्ताव पुन्हा महासभेवर ठेवण्याचे आदेश दिले.घंटागाडीप्रश्नी सदस्य आक्रमकसिडको प्रभाग समितीचे सभापती सुदाम डेमसे यांनी घंटागाडी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याचा ठराव तीन महिन्यांपूर्वी प्रभाग समितीने करूनही दखल घेतली जात नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. सदर घंटागाडी ठेकेदाराला न्यायालयात जाण्यासाठी प्रशासनाने वेळ दिल्याचा आरोपही डेमसे यांनी केला. भागवत आरोटे, डी. जी. सूर्यवंशी यांनीही ठेकेदाराच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त केली. परंतु, महासभेतही त्याबाबत समाधानकारक उत्तर सदस्यांना मिळू शकले नाही.