नाशिक : महापालिकेने विकसित केलेले मोबाइल अॅप्लिकेशन गेल्या अडीच महिन्यांत १९ हजार २०० नागरिकांनी डाउनलोड केले असून येत्या १५ ते २० दिवसात सदर अॅप्लिकेशन अॅपलवरही डाउनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.दि. १५ सप्टेंबर २०१५ रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते महापालिकेने विकसित केलेले मोबाइल अॅप्लिकेशनचे लोकार्पण करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या अडीच महिन्यांत १९ हजार २०० नागरिकांनी अॅप्स डाउनलोड केले आहे. अडीच महिन्यांत सदर अॅप्समध्ये जाणवलेल्या त्रुटी दूर करण्याचे काम आता सुरू असून मेसेजिंग सिस्टीमही अद्ययावत करण्यावर भर दिला जात आहे. महापालिकेमार्फत वेळोवेळी नागरिकांना सूचित करणारे संदेश लगेचच संबंधितांच्या इनबॉक्समध्ये पाहायला मिळणार आहेत. तक्रारींच्या निराकरणाचा दरही वाढविण्यात येत असून नागरिकांना सुलभपणे अॅप्स हाताळता येईल, अशी सिस्टीम विकसित केली जात असल्याचे महापालिका प्रशासनामार्फत सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
महापालिकेचे अॅप्स लवकरच अॅपलवरही
By admin | Updated: December 4, 2015 23:08 IST