कोरोनामुळे तसेच परिवहन महामंडळाच्या नाहरकत दाखल्यामुळे गेल्या दीड वर्षापासून ही बससेवा लांबणीवर पडली होती; परंतु आता कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर प्रशासनाने बससेवेसाठी जुलैच्या पहिल्या आठवड्याचा मुहूर्त मुक्रर केला आहे. त्यासाठी येत्या २४ तारखेला परिवहन महामंडळाची बैठक बोलविण्यात आली आहे. त्यात बससेवेचा आढावा घेतला जाणार असून, तत्पूर्वीच मंगवारी प्रशासन आणि ठेकेदार कंपन्यांच्या वतीने बससेवेचे ट्रायल रन सुरू करण्यात आले. त्यात शहरातील नाशिक रोड-शालिमार, नाशिक रोड-निमाणी, शालिमार-पंचवटी, नाशिक रोड-सातपूर, नाशिक रोड-सीबीएस-सातपूर या पाच मार्गांवर १० बस चालविण्यात आल्या. त्यात प्रत्येक बसचे लोकेशन, मार्ग, मोबाइल ॲपच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचतात की नाही, याची चाचणी करण्यात आली. सोबतच बसमध्ये सीसीटीव्हीची यंत्रणा बसविण्यात आली असून त्याचीही चाचणी करण्यात आली. प्रवासी म्हणून कंपनीच्या कर्मचाऱ्यांनाच बसविण्यात आले होते. शहरात पहिल्यांदाच ही बस रस्त्यावर उतरल्याने नागरिकांसाठी तो कुतूहलाचा विषय झाला होता.
चौकट===
या बससेवेत नागरिकांना हायटेक सुविधा मिळणार आहेत. त्यात प्रामुख्याने नवी मुंबईच्या धर्तीवर ‘इंटेलिजेंट ट्रान्सपोर्ट मॅनेजमेंट सिस्टिम’ (आयटीएमएस) या अद्ययावत संगणकीय प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे. त्यात विविध प्रकारच्या अत्याधुनिक सुविधा असणार असून त्यासाठी खासगी कंपनीला पाच वर्षे काम दिले आहे.
प्रत्येक बस जीपीएस संलग्न तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी सज्ज असणार असून कमांड ॲण्ड कंट्रोल सेंटरच्या माध्यमातून प्रत्येक बसवर नियंत्रण ठेवता येणार आहे.
(फोटो आहे)