शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

मुंगसरे रस्त्याची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 00:19 IST

मुंगसरे-चांदशी दरम्यान रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, रस्त्याने नागरिकांना पाठीचे व मणक्यांचे, मानेचे आजार जडले आहेत. या रस्त्यावर गेल्या काही दिवसांपूर्वी ठेकेदाराने थातूरमातूर खड्डे बुजवले होते, परंतु महिना होत नाही तोच खड्डे पूर्ण मोकळे झाले

मातोरी : मुंगसरे-चांदशी दरम्यान रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली असून, रस्त्याने नागरिकांना पाठीचे व मणक्यांचे, मानेचे आजार जडले आहेत. या रस्त्यावर गेल्या काही दिवसांपूर्वी ठेकेदाराने थातूरमातूर खड्डे बुजवले होते, परंतु महिना होत नाही तोच खड्डे पूर्ण मोकळे झाले असून, वाहनचालकांना व स्थानिक शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे. याविषयी रस्त्याची दुरु स्ती न झाल्यास स्थानिक शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.मुंगसरा, दरी, यशवंतनगर व इतर भागांतील नागरिकांना नाशिक शहराशी दळणवळण करणारा मध्यवर्ती व जवळचा असा महत्त्वाचा रस्ता आहे. या गावातील मजूर वर्ग कामाच्या निमित्ताने तसेच शालेय विद्यार्थी व इतर व्यावसायिक वर्ग याच रस्त्याचा वापर करत आहेत. यासाठी गावातील नागरिकांनी गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा अनेक शासकीय कार्यालयाचे उंबरठे झिजवले आहेत, असे असूनही या शेतकरी वर्गाच्या पदरी निराशा आली आहे. रस्त्यात पडलेली मोठमोठे खड्डे यामुळे वयोवृद्ध तसेच तरु ण वर्गालाही मानेच्या व मणक्याच्या आजाराने ग्रासले आहे. त्यात आता शेतकरी वर्गाचा टमाटा व इतर मालाचा सुरू होणार असल्याने या रस्त्यात येणारी जाणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे, त्यामुळे शेतकºयांना या मार्गाशिवाय कुठलाही पर्यायी मार्ग उपलब्ध नाही. या परिसरातील गारेवाडीला त्याचा फटका बसत आहे.रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून वाहन चालविणे सोडाच पायी चालणे मुश्किल झाले आहे. शासनाच्या दरबारी कागदोपत्री रस्ता तयार झालेला आहे त्याला उलटून चार वर्षे झालीत, पण हा रस्ता काही दुरु स्त होण्याचे नाव घेत नाही निवडणुकी आधी दर्शनी भागातील पन्नास-शंभर फुटाचे रस्ते अवघ्या दोन-तीन दिवसांत तयार झाले. या रस्त्याकडे दुर्लक्ष का?- गोरख म्हैसधुणे, स्थानिक शेतकरी

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतroad safetyरस्ते सुरक्षा