आशिष नरेश भोजवानी हे कुटुंबीयांसमवेत काही दिवसांपूर्वी नाशिकला आले होते. निमाणी येथून रामकुंडापर्यंतच्या प्रवासात ते एका रिक्षामध्ये आपल्या मौल्यवान वस्तूंची बॅग विसरले. ही बाब रिक्षाचालकाच्याही लक्षात आली नाही. धार्मिक विधी आटोपल्यानंतर भोजवानी यांना आपली बॅगेची आठवण झाली असता बॅग गायब असल्याचे समजले. यावेळी आपण ज्या रिक्षातून आलो त्याच रिक्षामध्ये बॅग विसरलो. यावेळी भोजवानी यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या संशयित रिक्षाचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र रिक्षा आढळून आली नाही, त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. मग जवळपास २००रिक्षा चालकांकडे याबाबत चौकशी केल्यानंतर एका रिक्षा चालकाचे नाव पुढे आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशी केल्यानंतर त्याने बॅग महत्त्वाच्या मौल्यवान वस्तुंसह पोलिसांकडे सुपुर्द केली. त्या बॅगेत विविध बँकेचे १६ क्रेडिट कार्ड, हार्ड डिस्क, लॅपटॉप मोबाइल, रोख ५ हजार रुपये असा २ लाख रुपयांचा ऐवज आढळून आला.
मुंबईकर पाहुणा रिक्षात विसरला बॅग; पोलिसांनी लावला शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:15 IST