शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

मुंबई महाराष्ट्रातच राहणार

By admin | Updated: February 27, 2015 22:58 IST

मुख्यमंत्र्यांची ग्वाही : अरुण साधू यांना जनस्थान पुरस्कार प्रदान

नाशिक : संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात विदर्भाने हौतात्म्य पत्करल्यानेच मुंबई महाराष्ट्रातच राहिली. या हौतात्म्याचा इतिहास सांगणारे आपण मुख्यमंत्री असून, आपण या पदावर असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहणार, तिला महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या मराठी साहित्यातील सर्वोच्च अशा ‘जनस्थान’ पुरस्कार प्रदान सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. महाकवी कालिदास कलामंदिरात झालेल्या दिमाखदार सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक अरुण साधू यांना ‘जनस्थान’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. एक लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, सौ. अरुणा साधू, ग्रंथाली प्रकाशनाचे संस्थापक दिनकर गांगल, ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, कार्यवाह लोकेश शेवडे व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईसह महाराष्ट्र व्हावा यासाठी १९६० मध्ये १०५ हुतात्म्यांनी बलिदान दिले; मात्र विदर्भ हा त्यातील १०६वा हुतात्मा आहे. पंडित नेहरू यांनी ‘महाराष्ट्र एकसंध राहिला, तर मुंबई महाराष्ट्रात राहील’ अशी अट घातली होती. विदर्भाने हे मान्य केल्यानेच मुंबई महाराष्ट्रात राहिली. विदर्भाच्या या हौतात्म्याचा इतिहास सांगणारा मी मुख्यमंत्री असून, मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू देणार नाही. मराठी भाषेला केवळ अभिजात दर्जा मिळून चालणार नाही. इतिहासात डोकावल्यास दोन प्रकारच्या भाषा टिकल्याचे समोर येते. एक म्हणजे आक्रमणकर्त्यांची भाषा आणि दुसरी जगण्याची व्यवस्था निर्माण करणारी भाषा.मराठी भाषा कधी कोणावर आक्रमण करू शकत नाही; पण मराठीला व्यवहाराची भाषा बनवता येईल. मराठी साहित्याने माणूस आनंदी वा अंतर्मुख होतो; पण ही भाषा जगण्याला मदत करत नाही, ही वस्तुस्थिती आहे. चीन, जपान या देशांनी आपल्या भाषांना जगण्याचे साधन बनविले. आधुनिक जगातील माहिती तंत्रज्ञान त्यांनी आपल्या भाषेत आणले. आज गुगलवर एखादी माहिती इंग्रजीत चटकन मिळते; मराठीत तसे होत नाही. आपल्याला हे निर्माण करावे लागेल. शासन अशा प्रतिभावंतांच्या पाठीशी उभे राहील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.