शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

कार-ट्रक अपघातात मुंब्य्राचे पोलीस निरीक्षक खांडवी मृत्यूमुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:16 IST

याबाबत अधिक माहिती अशी, मुंब्रा पोलीस ठाण्यात नोकरीस असलेले व मूळचे नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील रोकडपाडा येथील रहिवासी असलेले ...

याबाबत अधिक माहिती अशी, मुंब्रा पोलीस ठाण्यात नोकरीस असलेले व मूळचे नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील रोकडपाडा येथील रहिवासी असलेले पांडुरंग खांडवी हे वणी येथील एका नातेवाईकाच्या कौटुंबिक कार्यक्रमाला हजेरी लावून मुंब्राच्यादिशेने खासगी कारने (एम.एच ०२ डी.डब्ल्यू. ७०६६) कुटुंबीयांसह प्रवास करत होते. दरम्यान, वाडीवऱ्हेजवळील रायगडनगर येथे महामार्गाच्या नाशिक-मुंबई लेनवर रविवारी (दि.१४) रात्री ८ वाजताच्या सुमारास त्यांच्या कारला महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकच्या (एमपी ०९ एचएच ३७१७) चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत भरधाव ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात कट मारल्याने कारचालकाचे नियंत्रण सुटून कार ट्रकला धडकल्याचे वाडीवऱ्हे पोलिसांनी सांगितले. यावेळी कारमध्ये चालकासह एकूण पाच ते सहा प्रवासी होते. यावेळी घटनेची माहिती मिळताच घोटी महामार्ग पोलिसांसह वाडीवऱ्हे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जगद‌‌गुरु स्वामी नरेंद्राचार्य संस्थानच्या गोंदेफाटा येथील रुग्णवाहिकेने सर्व जखमींना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. पांडुरंग खांडवी हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. अपघातात मीना पांडुरंग खाडवी (४०), वैष्णवी पांडुरंग खांडवी (१५), जय पांडुरंग खांडवी (१२, सर्व. रा. कादरी मेन्शन, क्वाॅर्टर, माहीम पोलीस वसाहत, मुंबई) आणि कारचालक विनायक रघुनाथ सानप (२०, रा. मुंब्रा) हे जखमी झाले आहेत. दैव बलवत्तर असल्याने या चौघांचे प्राण वाचले.

----इन्फो--

मुंब्रा पोलीस दलात शोककळा

मुंब्रा पोलीस ठाण्यातील प्रशासन विभाागात पोलीस निरीक्षक म्हणून खांडवी मागील चार ते पाच वर्षांपासून कर्तव्यावर होते. ते मूळचे सुरगाणा येथील रहिवासी असून त्यांनी राज्यातील विविध शहरांमध्ये सेवा बजावली आहे. त्यांच्या अपघाती निधनाने मुंब्रा पोलीस दलात शोककळा पसरली असून उपायुक्त ए.एम. अंबुरे, सहायक आयुक्त सुनील घोसाळकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी दु:ख व्यक्त केले आहे. मुंब्रा पोलीस दल खांडवी यांच्या कुटुंबीयांसोबत असून कड यांनी खासगी रुग्णालयातील डॉक्टरांशी चर्चा करत जखमींवर सर्वोतोपरी अत्यावश्यक उपचार तातडीने करण्याची सूचना केली आहे.

-----

फोटो आर वर १५कार ॲक्सिडेंट नावाने. तसेच १५खांडवी नावाने आर वर मृताचा फोटो सेव्ह आहे.