शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

मुखेडला शेततळ्यात पडून दोन सख्ख्या भावांचा मृत्यू

By admin | Updated: June 26, 2017 22:51 IST

शेतात खेळत असताना शेततळ्यात पडले;मुखेड येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतात खेळत असताना शेततळ्यात पडलेल्या दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी (दि़२६) सायंकाळी पिंपळगाव बसवंतजवळील मुखेड गावात घडली़ खंडू रमेश दहिले (१४) व कार्तिक रमेश दहिले (१२, रा. दोघेही मुखेड) असे बुडून मृत्युमुखी पडलेल्या दोघा भावांची नावे आहेत़ पिंपळगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुखेड येथील सुनील किसन कदम यांच्या शेतात रमेश दहिले हे मजुरीचे काम करतात़ सोमवारी दहिले कुटुंबीय नेहेमीप्रमाणे मजुरीसाठी गेले होते़ सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शेतात खेळत असलेले खंडू व कार्तिक हे दोघे सख्खे भाऊ शेततळ्याजवळ गेले व पाय घसरून तळ्यात पडले व बुडाले़ यावेळी त्यांच्याजवळ कोणीच नसल्याने सायंकाळी कुटुंबीय घरी परतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला़शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडलेले खंडू व कार्तिक हे दोघेही भाऊ दुलाजीनाना आश्रमशाळेत इयत्ता सहावी व आठवीच्या वर्गात शिकत होते़ या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे़ दरम्यान, या प्रकरणी पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे़