शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मुखेड-महालखेडा रस्त्याची बाभळींच्या साम्राज्यात ‘वाट ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2020 00:42 IST

मुखेड : मुखेड- महालखेडा (भवानी देवी मार्ग) रस्ता दुतर्फा वाढलेल्या बाभळीच्या साम्राज्याने वाहतूकीसाठी बिकट झाला आहे. एकूण पाच किलोमीटर अंतराचा असणारा हा रस्ता महालखेडा व मुखेड या दोन गावांना जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. नेहमीच या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. गेल्या वीस वर्षांपासून या रस्त्याचे दुरु स्ती काम चालू आहे. पैकी चार किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले असून आता हा रस्ता खड्यात हरवला आहे.

ठळक मुद्देमुखेड : मुखेड- महालखेडा (भवानी देवी मार्ग) रस्ता दुतर्फा वाढलेल्या बाभळीच्या साम्राज्याने वाहतूकीसाठी बिकट झाला आहे. एकूण पाच किलोमीटर अंतराचा असणारा हा रस्ता महालखेडा व मुखेड या दोन गावांना जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. नेहमीच या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणा

लोकमत न्यूज नेटवर्कमुखेड : मुखेड- महालखेडा (भवानी देवी मार्ग) रस्ता दुतर्फा वाढलेल्या बाभळीच्या साम्राज्याने वाहतूकीसाठी बिकट झाला आहे.एकूण पाच किलोमीटर अंतराचा असणारा हा रस्ता महालखेडा व मुखेड या दोन गावांना जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. नेहमीच या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. गेल्या वीस वर्षांपासून या रस्त्याचे दुरु स्ती काम चालू आहे. पैकी चार किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले असून आता हा रस्ता खड्यात हरवला आहे. शेवटच्या एक किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे गेल्या चार वर्षापासून दुरु स्ती काम चालू आहे. सदर रस्ता दुरु स्तीसाठी वापरण्यात आलेली खडी न दाबता तशीच अस्ताव्यस्त पसरलेली आहे.एखाद्या ठेकेदार वर्षानुवर्ष रस्ता दुरु स्त करीत नसेल तर संबंधित शासकीय अधिकाच्या नजरेतून ही बाब कशी सुटली ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. सद्यस्थितीत या रस्त्याने चार चाकी वाहन तर जाऊ द्या साधे दुचाकी सारखे वाहनही जाऊ शकतं नाही, अशी या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. आता रब्बी हंगामातील सोयाबीन, मका आदी पिके पूर्णत्वाकडे जात असून महिन्याभरात या पिकांच्या सोंगणीस प्रारंभ होईल याशिवाय पिकांच्या मशागतीसाठी रोज प्रवास करताना या रस्त्याने कसे जावे या यक्ष प्रश्नाने शेतकरीवर्ग हादरून गेला आहे.संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रश्नी तातडीने लक्ष घालून संबंधीतांवर कारवाई करून रस्त्याची दुरु स्ती करून दुतर्फा वाढलेल्या बाबळीचे साम्राज्य हटवावे, अशी मागणी प्रतीक आहेर, दिलीप आहेर, गोरख राऊतराये, दत्ता आहेर, सचिन आहेर आदींनी एका निवेदनाद्वारे केली आहे. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाpwdसार्वजनिक बांधकाम विभाग